Advertisement

उंदरांच्या गोळ्यांचा खर्च ४ लाखांचा

उंदीर घोटाळ्याला वेगळं वळण मिळत असल्याचं दिसत आहे. कारण सरकारने ज्या कंपनीला कंत्राट दिलं होतं, त्या कंपनीने ३ लाख उंदीर मारले नाहीत, तर उंदीर मारण्यासाठी ४ लाख रुपयांच्या गोळ्या खरेदी केल्याचा खुलासा केला आहे.

उंदरांच्या गोळ्यांचा खर्च ४ लाखांचा
SHARES

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उंदीर घोटाळ्यावरून सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळत असल्याचं दिसत आहे. कारण सरकारने ज्या कंपनीला कंत्राट दिलं होतं, त्या कंपनीने ३ लाख उंदीर मारले नाहीत, तर उंदीर मारण्यासाठी ४ लाख रुपयांच्या गोळ्या खरेदी केल्याचा खुलासा केला आहे.


कुणाकडे होतं काम?

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विधानभवन, मंत्रालय आणि त्याला लागून असलेल्या इमारतीतील उंदीर मारण्यासाठी एकूण २ निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार ३ मे २०१६ रोजी विनायक मजूर सहकारी संस्था मर्यादित या कंत्राटदारांना उंदीर मारण्याचं काम देण्यात आलं.



किती खर्च?

या दोन निविदांप्रमाणे उंदीर मारण्यासाठी एकूण ३ लाख १९ हजार ४०० इतक्या गोळ्या पुरविण्यात आल्या. यातील एका गोळीची किंमत १.५० रुपये (दीड रुपये) इतकी असून या संपूर्ण कामासाठी ४,७९,१०० रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पीडब्ल्यूडीने दिली.


उंदीर नव्हे गोळ्या

माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात देखील हेच नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नमूद करण्यात आलेला आकडा हा उंदरांचा नसून गोळ्यांवर करण्यात आलेल्या खर्चाचा आहे. याआधी २०१०-११ आणि २०११-१२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात सुद्धा दीड रुपये प्रतिगोळी याच दराने कंत्राट देण्यात आलं होतं, असं त्यांनी खुलशात स्पष्ट केलं आहे.

या खुलाशामुळे आता नवा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी खरंच इतक्या गोळ्यांची गरज होती का?



हेही वाचा-

उंदीर मारायला पालिकेकडे यंत्रणा अपुरी?

शताब्दी रुग्णालयात 'उंदीर पकडो मिशन'

उपचारांसाठी आल्या अन् उंदीर चावला, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील प्रकार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा