Advertisement

मराठी भाषा संवर्धनासाठी मुंबईत कार्यक्रमाचं नियोजन

राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मराठी भाषा संदर्भातील विविध उपक्रम राज्यभर राबविले जाणार आहेत.

मराठी भाषा संवर्धनासाठी मुंबईत कार्यक्रमाचं नियोजन
SHARES

राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात मराठी भाषा संदर्भातील विविध उपक्रम राज्यभर राबविले जाणार आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील विविध उपक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी माधव पाटील उपस्थित होते.

यावेळी जिल्हा ग्रंथालय, एशियाटिक लायब्ररी,साहित्य संघ, मुंबई तसेच एसएनडीटी विद्यापीठ मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, महानगरपालिका शिक्षण विभाग आदींच्या माध्यमातून या संदर्भाच्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे विविध उपक्रमांचं आयोजन करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. 

हेही वाचा- ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला   

या पंधरा दिवसांत मराठी साहित्याचं ग्रंथप्रदर्शन, ऑनलाईन व्याख्याने, स्पर्धा, या क्षेत्रातील मान्यवर व नामवंतांचा सत्कार, ई बुक अशा उपक्रमांचं आयोजन करावं, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी एशियाटिक सोसायटीच्या बलापोरिया, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, साहित्य संघाचे सुभाष भागवत, शासकीय मुद्रणालयाचे सहायक व्यवस्थापक  सचिन केदार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गेल्याच महिन्यात शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नव लेखकांसाठी कथा, कविता, संशोधन, अनुवाद, ब्लॉग लेखन अशा वैविध्यपूर्ण विषयांवर निःशुल्क लेखन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलं होतं.

(maharashtra government will celebrate marathi language promotion fortnight in january 2020)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा