Advertisement

दिलासादायक! दीड वर्षानंतर मुंबईत सर्वाधिक कमी कोरोना रुग्ण

या वर्षात प्रथमच ही आकडेवारी इतक्या खाली आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे दिलासादायकच आहे.

दिलासादायक! दीड वर्षानंतर मुंबईत सर्वाधिक कमी कोरोना रुग्ण
SHARES

उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी, २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा कोविड-19 आलेख प्रथमच १००० च्या खाली आला. या वर्षात प्रथमच ही आकडेवारी इतक्या खाली आली आहे.

शिवाय, सोमवार, २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ३६ पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

महाराष्ट्रात फक्त ८८९ नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ५ मे नंतरची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २४ तासात ८४१ रुग्णांची नोंद झाली होती. रविवार, २४ ऑक्टोबर रोजी १ हजार ४१० रुग्णांची नोंद करण्य़ात आली होती. त्यापेक्षा ही आकडेवारी नक्कीच कमी आहे, असं म्हणता येईल.

पुणे, मुंबई, रत्नागिरी आणि ठाणे या केवळ चार जिल्ह्यांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतल्या २ जिल्ह्यांमध्ये ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुणे आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी दोन आणि नवी मुंबईत एक मृत्यू झाला आहे.

हे देखील निदर्शनास आले आहे की १४ जिल्ह्यांमध्ये सोमवारी एकही रुग्ण आढळला नाही. तर १२ जिल्ह्यांमध्ये एक अंकी प्रकरणे आढळली.

दरम्यान, भारताची आर्थिक राजधानी, मुंबईमध्ये २६३ नवीन कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील एकूण केसलोड आणि मृत्यूची संख्या अनुक्रमे ७,५४,७७० आणि १६ हजार २२० आहे. १४ ऑगस्ट २०२१ पासून मुंबईतील पहिल्यांदा इतकी कमी म्हणजेच २६५ कोरोनाव्हायरस रुग्ण नोंदवले गेले आहेत.हेही वाचा

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईत फिरते केंद्र

डिसेंबरपर्यंत जम्बो कोरोना केंद्रे खुली राहणार पालिकेचा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा