Advertisement

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार खिचडीऐवजी ज्वारी, बाजरीची भाकर

मधल्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांना आता खिचडीऐवजी ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिलं जातं.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार खिचडीऐवजी ज्वारी, बाजरीची भाकर
SHARES

मधल्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांना आता खिचडीऐवजी ज्वारी आणि बाजरीची भाकरी देण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिलं जातं. त्यामध्ये, विद्यार्थ्यांना तांदळाची खिचडी, मटकी, वटाणा, चना या कडधान्यांचा समावेश होता. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना अधिक पौष्टीक अन्न मिळावे, यासाठी या मध्यान्ह भोजनात बदल केला आहे.

पोषण आहारात अडचणी

ऑक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना जेवणात ज्वारीची आणि बाजरीची भाकरी, नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून सर्वच शाळांना ज्वारी आणि बाजरीचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या शालेय पोषण आहारातच अनेक अडचणी येत आहेत. कधी तांदुळाचा पुरवठा नसतो, तर कधी खिचडी बनवणारा स्वयंपाकी नसतो. यासह अनेक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागतो.

महिलांची भरती

विद्यार्थ्यांना भाकरी देण्याचा निर्णय घेतल्यानं शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बनविण्यासाठी महिलांचीच भरती करावी लागणार आहे. सध्या पुरुष स्वयंपाकीही हे भोजन बनवितात. मात्र, भाकरीची अट असल्यास ते स्वयंपाकी तयारी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, या स्वयंपाकींना देण्यात येणारे मासिक मानधनही खूप कमी आहे. त्यामुळं मानधन वाढविण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळं शाससानं ही योजना राबवताना यंत्रणाही स्वतंत्र उभारावी असं शाळेतील मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.



हेही वाचा -

खूशखबर! म्हाडाची राज्यभरात १४,६२१ घरांसाठी सोडत

काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र, सुरक्षेची मागणी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा