कोणताही मतदार मागे राहता कामा नये..माहीम दर्गा एएलएमचा अनोखा उपक्रम

  MAHIM
  कोणताही मतदार मागे राहता कामा नये..माहीम दर्गा एएलएमचा अनोखा उपक्रम
  मुंबई  -  

  मतदान यादीत नवीन नाव नोंदणी, पत्ता किंवा नाव बदलायची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईच्या माहीम दर्गा अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटने तिथल्या स्थानिकांसाठी एक मोहीम राबवली. ज्यामध्ये काही स्थनिक नागरिक आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 2 ऑगस्ट 2017 रोजी माहीमच्या हुसेन कॉलनीमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.


  अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटची संकल्पना ही ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठीच झाली आहे. पण आज आपल्याला लोकतंत्र शाबूत ठेवण्यासाठी आपले एकही मत वाया जाऊ देता कामा नये, त्यासाठी ही विशेष मोहीम राबवली.

  अन्वर खान, अध्यक्ष, एएलएम माहीम दर्गा

  मतदान काय असते? मतदान करणे किती महत्त्वाचे असते? याची माहिती देखील या मोहितेतून स्थानिकांना देण्यात आली.

  या मोहिमेत जर कुणाचे नाव मतदान यादीत नोंदवायचे असल्यास 18 वर्षांवरील तरुण तरुणींना आवश्यक कागदपत्र तिथे असलेल्या निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांना द्यायची होती. त्यानंतर पुढील छाननी पूर्ण झाल्यावर त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा -

  मुख्यमंत्री माहीमकरांना न्याय देणार का?

  कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.