Advertisement

मुंबईतील सिंधिया हाऊसला अाग


मुंबईतील सिंधिया हाऊसला अाग
SHARES

मुंबईत अागी लागण्यांच सत्रं सध्या थांबायचं नावच घेत नाही. गोरेगावच्या अग्निकांडाला काही दिवस उलटले नाही तोच अागीची तिसरी घटना मुंबईत घडली आहे. शुक्रवारी दुपारी ४.५० वाजता फोर्ट परिसरातील सिंधिया हाऊसला अाग लागली. याच इमारतीत अायकर विभागाचंही कार्यालय अाहे. अग्निशामन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगिवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू अाहे.



५ लोक अडकले

तिसऱ्या अाणि चौथ्या क्रमांकावर ही अाग लागली असून ४ ते ५ जण अडकल्याची माहिती अाहे. दुसऱ्या मजल्यावर एक जण अडकला होता. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात अालं अाहे. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या नीरव मोदीशी निगडित सर्व कागदपत्रं याच इमारतीत असल्याचंही सांगितलं जात आहे.




मोठा अनर्थ टाळला

फोर्ट परिसरात बरीच कार्यालये असून लोकांची कायम वर्दळ असते. अागीसारख्या घटनांमुळे याठिकामी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.


७ जण जखमी

या अागीत अग्निशमन दलाच्या एका जवानासह ७ जण जखमी झाले अाहेत. या सर्वांना सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात अालं अाहे. सर्व जण किरकोळ जखमी असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून प्राप्त झाली अाहे. 


हेही वाचा -

आगीत होरपळतानाही 'त्याला' होती कुटुंबाची चिंता

गोरेगावमधील भीषण आगीत तिघांचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा