Advertisement

मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर


मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३१ वर
SHARES

मालाडच्या पिंपरीपाडा इथं भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या ३१ वर जाऊन पोहोचली आहे. 

मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा इथं १ जुलै २०१९ च्या मध्यरात्री अतिवृष्टीने आंबेडकर नगर आणि पिंपरीपाडा परिसरातील मालाड जलाशयाची २.३ किमी लांबीची संरक्षण भिंत ढासळली होती. भिंत ढासळल्याने या भिंतीने अडवून धरलेलं लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरून अनेक घरांचं नुकसान झालं. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर १२० जण जखमी झाले होते. या रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची तर महापालिकेकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. तसंच या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत सरकारने जाहीर केली आहे. 

मालाड दुर्घटने प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांमध्ये या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हेही वाचा-

मुंबई की दुर्घटनांचं शहर?

मालाड दुर्घटना: चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा