मराठी कलाकार 'बेस्ट'ला वाचवण्यासाठी पुढे सरसावले

 Mumbai
मराठी कलाकार 'बेस्ट'ला वाचवण्यासाठी पुढे सरसावले
Mumbai  -  

ओला, उबर, रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याने ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती मंदावली. तसेच बेस्ट तोट्यात जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करुन उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासन अनेक उपक्रम राबवत आहे.
यामध्ये लग्नासाठी बेस्ट बस देणे किंवा एसी बस आणणे असे अनेक प्रयोग देखील केले जात आहेत. यालाच आता मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारही हातभार लावणार आहेत.


बेस्ट प्रशासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी अभिनेता प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अतुल तोडकर, शीतल शुक्ल आणि अविनाश नारकर या कलाकारांना पुढाकार घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्याला या कलाकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काळात हे कलाकार बेस्टच्या योजनांचा प्रसार करताना दिसण्याची शक्यता आहे.याच कलाकारांची निवड का?

प्रथितयश कलाकार बनण्यापूर्वी ही सर्व मंडळी 'बेस्ट' मध्ये नोकरी केली आहे. 'बेस्ट'च्या वतीने विविध नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या कलागुणांची चुणूक दाखवण्याची संधी त्यांना मिळाली. बेस्ट प्रति कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची संधी यातल्या एकाही कलाकाराला सोडायची नव्हती. कोणतेही मानधन न घेता देणार संदेश

अभिनेता प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अविनाश नारकर यांच्यासारखे कलाकार मुंबईकरांना ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करणार आहेत. ‘बेस्ट’च्या गाड्यांमधून सुरक्षित प्रवास करा', ‘बेस्टची वीज वापरा', असे संदेश देखील हे कलाकार देणार आहेत. पण यासाठी ते कोणत्याही प्रकारचे मानधन स्वीकारणार नाहीत, अशी माहिती बेस्ट जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


7 ऑगस्ट या ‘बेस्ट’ दिनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. याला कलाकारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून ‘बेस्ट’चे कर्मचारी राहिलेले आणि सध्या मराठी सिने-नाट्य सृष्टीत नाव कमावलेले अभिनेते प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अतुल तोडकर आणि शीतल शुक्ल यांनी ‘बेस्ट’चा प्रचार आणि प्रसारासाठी नि:शुल्क योगदान देण्यासाठी तयारी दाखवली आहे.


- अनिल कोकीळ, अध्यक्ष, बेस्ट समिती
हेही वाचा - 

बेस्टला मिळणार 4 कोटी, कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटणार?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments