Advertisement

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणार मार्शल्स

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक जण मास्क वापरत नसल्याचं आढळून आलं आहे.

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणार मार्शल्स
SHARES

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक जण मास्क वापरत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यांच्यावर मुंबई पालिकेने कारवाई करून दंडही वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता महापालिकेच्या के पश्चिम विभागाने मार्शलची नियक्ती केली आहे. 

लाॅकडाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. अंधेरी पश्चिम भागात मास्क न घालता फिरणारे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी  के पश्चिम विभागाने कंबर कसली आहे.  मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी के पश्चिम विभागाने सहा मार्शलची नियुक्ती केली आहे. अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरात कारवाई करण्यासाठी तीन पथके सज्ज करण्यात आली आहेत. एका पथकात दोन मार्शल आणि एक सुरक्षारक्षक असेल. या पथकांना परिसर नेमून देण्यात आले आहेत.

दंडात्मक कारवाईच्या आडून गैरप्रकार घडू नये यासाठी कंत्राटी पद्धतीऐवजी पालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचीच मार्शल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गैरप्रकार केलेल्या  मार्शलवर कारवाई केली जाणार आहे. त्याला आपली नोकरीही गमवावी लागण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा