धोकादायक इमारतींचा होणार पुनर्विकास

रामदुत या पुनर्रचित ५ मजली इमारतीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या इमारतीसह इतर पुनर्रचित इमारतींची धोकादायक स्थिती लक्षात घेत त्यांचीही तातडीनं दुरूस्ती करण्यात येणार आहे.

SHARE

मुंबईतील करीरोड येथील रामदूत इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात पंखा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शनिवारी ही घटना घडली असून या घटनेची म्हाडानं गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार, रामदुत या पुनर्रचित ५ मजली इमारतीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या इमारतीसह इतर पुनर्रचित इमारतींची धोकादायक स्थिती लक्षात घेत त्यांचीही तातडीनं दुरूस्ती करण्यात येणार आहे. 

१९७७ मध्ये बांधकाम

१९७७ मध्ये म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळानं रामदूत या इमारतीचं बांधकाम केलं होतं. ही इमारत पुनर्रचित घटकातील आहे. सुमारे ४० वर्षांच्या कालावधीत या इमारतीमध्ये गळतीसारख्या अनेक समस्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याशिवाय, यावर अनेकदा उपायही करण्यात आले. मात्र, अद्याप मूळ समस्यांचा प्रश्न सुटलेला नाही. 

इमारतींची अवस्था

रामदुत या या इमारतींची अवस्था लक्षात घेता पुनर्विकासाच्या दृष्टीनं योजना राबविण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केलं जाणार आहेत. नुकतंच राज्य सरकारनं जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगानं धोरणात नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. त्याआधारे जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासावर भर दिला जाणार आहे.हेही वाचा -

जे.जे. उड्डाणपुलावर वेगमर्यादेमुळं प्रवासी नाराज

मच्छिमारांच्या मुलांना तटरक्षक दलात संधी, विशेष भरती प्रक्रिया राबवणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या