Advertisement

मिठी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली, ५० नागरिकांचं स्थलांतर

मुंबईत पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास आयुक्तांनी सांगितले. या काळात सर्व आस्थापना आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले.

मिठी नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली, ५० नागरिकांचं स्थलांतर
SHARES

मुंबई आणि उपनगरात काल रात्री पावसाचा जोर वाढल्याने मिठी नदीची पातळी वाढली. कुर्ला (Kurla) पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगर पाण्याखाली गेलं. त्यामुळे त्या परिसरात रहात असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेने तेथील ५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. त्यानंतर पावसाची तीव्रता (Heavy rain) कमी झाल्यानंतर नागरिकांना स्वगृही पाठवण्यात आले.

हेही वाचाः- Mumbai Rains मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द

मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचं पहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवार सायंकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत, तर रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबईत पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास आयुक्तांनी सांगितले. या काळात सर्व आस्थापना आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचाः- मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रस्ते, स्टेशन जलमय

दरम्यान मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर मिठी नदीला लागून असलेल्या झोपड्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला.  मिठी नदीच्या मार्ग क्रमणातील कुर्ला येथील क्रांतीनगर पाण्याखाली गेल्याने तेथील ५० जणांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर त्यांना स्वगृही पाठवले. दरम्यान कालच्या पावसात मुंबईत ४० ठिकाणी शाँर्ट सक्रिटच्या घटना घडल्या असून १२ ठिकाणी झाडं आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर ताडदेव येथील नवीन जायफळवाडी, एसआरए इमारतीसमोर ताडदेव पोलिस ठाण्याच्या मागे दरडीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा