Advertisement

मोकळ्या जागांच्या मुद्द्यावर महापालिकेत विरोधक आक्रमक


मोकळ्या जागांच्या मुद्द्यावर महापालिकेत विरोधक आक्रमक
SHARES

मुंबईतील उद्याने, मैदानांसह क्रिडांगणाच्या मोकळ्या जागा पुन्हा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचे धोरण काही दिवसांपूर्वी पालिकेकडून मंजूर करण्यात आलं. मात्र, या धोरणाला शिवसेना आणि भाजपाने मंजुरी दिल्यामुळे सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिका सभागृहात महापौरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी 'महापौर हाय हाय'च्या घोषणा देत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या शिवसेना आणि भाजपाचाही तीव्र निषेध करण्यात आला.


काय झालं विरोधकांना संतापायला?

आधी मैदाने, उद्यानांच्या मोकळ्या जागा खासगी संस्थांकडून ताब्यात घेण्यात आल्या. पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरता खासगी संस्थांनाच मोकळ्या जागा देण्याच्या धोरणावर कोणत्याही प्रकारची चर्चा करू न देता शिवसेनेने पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाला मदतीने मंजूर केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत.

सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख आणि मनसेचे गटनेते संजय तुर्डे यांनी आपल्या नगरसेवकांसह सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाचा तीव्र विरोध केला.


विरोधकांची नक्की मागणी काय?

यावेळी संस्थांच्या ताब्यात असलेल्या २९ मोकळ्या जागा शिवसेना आणि भाजपाने महापलिकेला परत कराव्यात अशी मागणी केली. यावेळी विरोधी पक्षांच्या वतीने महापौरांच्या विरोधात फलक फडकावून 'महापौर हाय हाय'च्या घोषणा दिल्या गेल्या. तब्बल २० मिनिटे विरोधी पक्षांनी या मोकळ्या जागांच्या मुद्दयावरून सभागृहात गोंधळ घालून महापौरांना हैराण करून सोडले. परंतु, या गोंधळातच महापौरांनी कामकाज सुरुच ठेवले.



हेही वाचा

मुंबईतील ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ मोकळ्या जागा पुन्हा खासगी संस्थांच्या घशात

मैदाने लाटणाऱ्या शिवसेनेने 'स्वेट ऑन स्ट्रीट'च्या माध्यमातून मुलांना रस्त्यांवर खेळवले


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा