Advertisement

मीरा भाईंदरमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, ८० टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मीरा भाईंदरमध्ये रुग्ण सापडत असले तरी दिलासादायक म्हणजे कोरोनानं बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे.

मीरा भाईंदरमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, ८० टक्के रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. दिवसाला एकडे कोरोना रुग्ण सापडत आहेत. पण दिलासादायक म्हणजे कोरोनानं बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. मीरा भाईंदरमध्ये ८० टक्क्याहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

१० ऑगस्टपर्यंत, मीरा भाईंदरमधील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ९ हजार ७१४ च्या घरात आहे. तर यापैकी ७ हजार ९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच ८० टक्के पेक्षा अधिक नागरिक कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

सोमवारी मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे १३१ नवीन रुग्ण आढळले. तर सोमवारी १३४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३१८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदरमध्ये सध्या १ हजार ४९२ पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. अनलॉक ३.० देखील १ ऑगस्टपासून सुरू झालं आहे. परंतु त्याचा ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये फारसा परिणाम दिसलेला नाही. परिसरातील मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स अद्याप बंदच राहतील. नव्या निर्देशानुसार आता मीरा-भाईंदरमध्येही ३३ टक्के क्षमतेसह हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सुरू होतील.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीमध्ये २०१ नवे रुग्ण

ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

धारावी नियंत्रणात, दादर, माहीममध्ये रुग्णवाढ कायम

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा