Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन

आपल्या मागण्यांच्या पुर्तेतेसाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. मागील १६ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, एसटी कर्मचाऱ्यांची तीव्रता वाढू लागली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन
SHARES

आपल्या मागण्यांच्या पुर्तेतेसाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. मागील १६ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, एसटी कर्मचाऱ्यांची तीव्रता वाढू लागली आहे. अशातच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवास स्थानाबाहेर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी काळं फेकण्याचाही प्रयत्न केला.

पोलिसांनी या प्रकरणी ४ ते ५ आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. मागील काही दिवसांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आझाद मैदानाबाहेर पडण्यास पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता.

मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ डांबर सदृष्य काळं फेकले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मागील १५ दिवसापासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. एसटीच्या संपामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

या बैठकीत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं  त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा