Advertisement

ठरलं... अंबानी पुत्राचं लग्न इथं होणार!


ठरलं... अंबानी पुत्राचं लग्न इथं होणार!
SHARES

सेलिब्रिटी, उद्योगपती वा खेळाडूचं लग्न म्हटलं की डेस्टिनेशन वेडिंग निश्चित असतं. फ्रान्स, इटली, दुबई अशा ठिकाणी देशाबाहेर जाऊन लग्न करण्याचा जणू एक नवा ट्रेंडच सेलिब्रिटींनी तयार केला आहे. असं असताना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचं लग्न नेमंक कुठं होणार, देशात होणार की देशाबाहेर, याची जोरदार चर्चा सध्या रंगली अाहे. पण या चर्चेला अखेर अंबानी कुटुंबियांनी पूर्णविराम दिला आहे. आकाश आणि श्लोका यांचं लग्न भारतातच होणार असून ते उत्तराखंड येथील एका मंदिरात पार पडणार आहे.


त्रियुगी नारायण मंदिराची निवड

काही दिवसांपूर्वीच आकाशचा साखरपुडा हिरेव्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका हिच्याशी थाटामाटात संपन्न झाला. या साखऱपुड्याची चर्चा देशभर रंगली होती. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती या दोघांच्या लग्नाची. लग्न कुठं आणि कसं होणार याची. त्यानुसार लग्नाचं ठिकाण अखेर अंबानी कुटुंबियांनी निश्चित केलं आहे. उत्तराखंडमधील त्रियुगी नारायण मंदिर इथं अाकाश-श्लोकाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती चर्चा अाहे.


मंदिराचं वैशिष्ट्य

समुद्रसापटीपासून ९ हजार फूट उंचीवरील एका छोट्याशा गावात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचं लग्न होणार, हे एेकून अनेकांना नवल वाटेल. पण हे ठिकाण निवडण्यामागं एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे ज्या त्रियुगी नारायण मंदिरात हा विवाहसोहळा पार पडणार आहे, त्या मंदिराला पुराणात मानाचं स्थान अाहे. या मंदिरातच शिव आणि पार्वतीचा विवाहसोहळा पार पडल्याची आख्यायिका आहे. इथं झालेली लग्नं सात जन्म टिकतात, अशी धारणा आहे. त्रियुगी नारायण मंदिराची ओळख वेडिंग डेस्टिनेशन अशी असून इथंही अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली आहे. दरम्यान, या विवाहसोहळ्याला खास, मोजक्या व्यक्तिंना निमंत्रित केलं जाणार असल्याची माहिती आहे.


हेही वाचा -

होणार सून मी अंबानींच्या घरची

आकाश अंबानीची निमंत्रणपत्रिका पाहिलीत का?

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा