Advertisement

परदेशातून मुंबईत येणाऱ्यांना पालिकेने घातले 'हे' नियम


परदेशातून मुंबईत येणाऱ्यांना पालिकेने घातले 'हे' नियम
SHARES

परदेशातून मुंबईत येणाऱ्यांसाठी मुंबई मुंबई महापालिकेकडून (BMC) नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या प्रोटोकॉल नुसार, या देशांतून येणाऱ्या नागरिकांना बुधवार पासून ७ दिवसांसाठी इंस्टिट्युशन क्वारंटाइन अनिवार्य असणार आहे. या दिवसांच्या क्वारंटाइनच्या काळातील ५ व्या आणि ७ व्या दिवशी त्यांची Rt-PCR चाचणी केली जाणार आहे. तर ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे. मात्र घरी गेल्यानंतरही ७ दिवस त्यांना होम क्वारंटाइन रहावे  लागणार आल्याचे आरोग्य विभागातील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले आहे.

हेही वाचाः -रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लांबणीवर

महाराष्ट्राबाहेरील जर एखादा प्रवासी असल्यास त्याला त्याच्या गंतव्य ठिकाणी जाऊ दिले जाणार आहे. पण या प्रवाशांचा गाडी क्रमांक, दुसऱ्या राज्यातील पत्ता आणि त्या राज्यातील चीफ सेक्रेटरीला त्याच्या बद्दल कळवले जाणार आहे. त्यांना दुसऱ्या राज्यात जाण्याची पूर्णपणे परवानगी असणार आहे. परंतु जे प्रवासी महाराष्ट्रातील स्थानिक नागरिक असणार आहेत त्यांना ७ दिवस इंस्टिट्युशनल क्वारंटाइन अनिवार्य असणार आहे. महापालिकेचे उपायुक्त आयुक्त अनिल वानखेडे यांनी असे म्हटले की, जे प्रवासी मुंबईत येतील पण महाराष्ट्राच्या बाहेरील असतील त्यांच्याकडे Rt-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे असणार आहे. महापालिकेच्या मते, मंगळवारी युके येथून जवळजवळ ५९१ प्रवासी परतले आहेत. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असून युके येथून आल्याने त्यांना हॉटेल मध्ये ७ दिवसांच्या इंस्टिट्युशन क्वारंटाइन करिता ठेवण्यात आले आहे.

हेही वाचाः- रात्रीच्या संचारबंदीतही रिक्षा-टॅक्सी सुरू राहणार

युके येथून आलेल्या जवळजवळ ३०० जणांना पुढील ७ दिवसांसाठी हॉटेलमध्ये इंस्टिट्युशनल क्वारंटाइनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांची Rt-PCR ही चाचणी होणार असून ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी जाता येणार आहे. ५९१ प्रवाशांपैकी २३६ हे महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. त्यांना ही इंस्टिट्युशनल क्वारंटाइन केले जाणार आहे. हॉटेलचे दर प्रत्येक दिवसाच्या रात्रीसाठी हे १००० ते ४५०० दरम्यान आहेत. यामध्ये तीन वेळचे खाणे आणि संध्याकाळची चहा दिली जाणार आहे. नागरिकांना त्यांना परवडणाऱ्या पैशात हॉटेल निवडता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा