Advertisement

राणीच्या बागेत जागतिक दर्जाची ॲक्वा गॅलरी उभारण्याच्या हालचालिंना वेग

2022 मध्ये तत्कालीन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या वरळी येथील मत्स्यालयाच्या मोठ्या प्रकल्पासाठी हा प्रकल्प आधी रद्द करण्यात आला होता.

राणीच्या बागेत जागतिक दर्जाची ॲक्वा गॅलरी उभारण्याच्या हालचालिंना वेग
Image for representation
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जागतिक दर्जाची ॲक्वा गॅलरी उभारण्याची पालिकेची योजना आहे. 

2022 मध्ये तत्कालीन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या वरळी येथील मत्स्यालयाच्या मोठ्या प्रकल्पासाठी हा प्रकल्प आधी रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा अमलात आणण्यासाठी, BMC पुढील महिन्यापर्यंत मत्स्यालयासाठी निविदा मागवण्याच्या तयारीत आहे.

भायखळा प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन प्रदर्शनासमोर सुमारे 600 चौरस मीटर क्षेत्रफळावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे. बीएमसीने अंदाजे खर्च 44 कोटी इतका येणार असल्याचे म्हटले आहे. तथापि, महाविकास आघाडी (MVA) ने वरळी डेअरी कॉम्प्लेक्समध्ये 14.55 एकरमध्ये पसरलेले एक मोठे मत्स्यालय बांधण्याची घोषणा केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही योजना रद्द केली.

एक्वा गॅलरीमध्ये 2 ॲक्रेलिक वॉक-थ्रू टनेल

राज्य सरकार बदलल्याने वरळी येथील मत्स्यालय प्रकल्प रखडला होता. "प्रकल्पावर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि एक्वा गॅलरीचे काम 2024-25 या आर्थिक वर्षात केले जाईल," असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला सांगितले. बीएमसीच्या योजनेनुसार, मत्स्यालयाला घुमट आकाराचे प्रवेशद्वार आणि दोन ॲक्रेलिक वॉक-थ्रू बोगदे असतील. 14 मीटरचा बोगदा कोरल माशांसाठी खास असेल, तर दुसरा 36 मीटर लांब बोगदा खोल समुद्रातील जलचर प्रजातींसाठी राखीव असेल.

मत्स्यालयाचे वैशिष्ट्ये

  • मत्स्यालयात 46 विविध समुद्री प्रजातींचे चार चौकोनी, पाच वर्तुळाकार आणि दोन अर्धवर्तुळाकार फिश टँक असतील.
  • पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी 10 लाख लिटर क्षमतेची विशेष जलजीव रक्षक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 
  • एक प्रयोगशाळा, जीवन समर्थन प्रणाली आणि  देखभालीसाठी मीठ-मिश्रण कक्ष
  • विंडोमधून जलजीवनाचे सर्वात जवळचे 360° दृश्य अनुभवता येईल. 

त्यामुळे येत्या काळात राणीच्या बागेत पेग्विंनप्रमाणेच लवकरच मत्स्यालयाचे आकर्षण असणार आहे. 



हेही वाचा

दोन नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू

मुंबईत पालिका अंडरग्राऊंड मार्केट उभारणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा