Advertisement

ऑनलाइन औषधविक्रीविरोधात केमिस्ट धडकणार एफडीएवर

केंद्र सरकार ऑनलाइन औषध विक्रीला अधिकृत मान्यता देण्याच्या तयारीत आहे. या संबंधीचा अंतिम निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो. केमिस्ट मालक यावरून चांगलेच संतापले असून मुंबईतील केमिस्ट मालकांनी याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.

ऑनलाइन औषधविक्रीविरोधात केमिस्ट धडकणार एफडीएवर
SHARES

गेल्या ३-४ वर्षांपासून ऑनलाइन औषधविक्री अर्थात ई-फार्मसीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. एकीकडं औषधविक्रेते (केमिस्ट) आणि फार्मासिस्ट ऑनलाइन औषधविक्रीला विरोध करत आहेत. तर दुसरीकडं केंद्र सरकार ऑनलाइन औषध विक्रीला अधिकृत मान्यता देण्याच्या तयारीत आहे. या संबंधीचा अंतिम निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो. केमिस्ट मालक यावरून चांगलेच संतापले असून मुंबईतील केमिस्ट मालकांनी याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.


रुग्णांच्या जीवाला धोका

ऑनलाइन औषधविक्रीमुळ चुकीची औषध देण्याचं प्रमाण वाढून त्यातून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर शेड्युल एच, एच-१ मधील प्रतिबंधक औषध सहज उपलब्ध होतील, असं म्हणत महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मुंबई विभाग रस्त्यावर उतणार आहे. १६ जुलैला वांद्रे येथील अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या मुख्यालयावर दुपारी २ वाजता केमिस्ट धडकणार आहेत.



प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

औषध आणि सोंदर्य प्रसाधन कायद्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनेच आणि फार्मासिस्टच्या उपस्थितच औषध विक्री करणं बंधनकारक आहे. तर या कायद्याचा भंग करणाऱ्याविरोधात कडक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. असं असताना केंद्र सरकार ऑनलाइन औषध विक्रीस परवानगी देण्याच्या तयारीत आहे.


नशा, गर्भपाताचा बाजार वाढेल

औषध विक्री ही गोळ्या बिस्कीटाची विक्री नाही असं म्हणत केमिस्ट आणि फार्मासिस्टनी मात्र या ऑनलाइन औषध विक्रीला विरोध केला आहे. यामुळ नशेची आणि गर्भपाताची औषध सहज उपलब्ध होतील नि नशेचा-गर्भपाताचा बाजार वाढेल असं म्हणत याला विरोध होतो आहे. तर यामुळ केमिस्ट आणि फार्मासिस्टच्या व्यवसायावरही परीणाम होईल असं म्हटलं जातं आहे.

या पार्श्वभूमीवर केमिस्टनी ऑनलाइन औषधविक्रीस मान्यता देऊ नये, अशी मागणी उचलून धरली आहे. याच मागणीसाठी केमिस्ट मालक १६ जुलैला एफडीएवर धडकणार आहेत. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा केमिस्ट मालकांनी दिला आहे.



हेही वाचा-

औषधांच्या पाकिटांवर धोक्याचा इशारा, १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

जागतिक आरोग्य दिवस: नाहीतर, छोटे आजार होतील मोठे!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा