Advertisement

तेजस ट्रेनमध्ये प्रवाशांना विषबाधा, कंत्राटदाराची चौकशी सुरूच


तेजस ट्रेनमध्ये प्रवाशांना विषबाधा, कंत्राटदाराची चौकशी सुरूच
SHARES

तेजस ट्रेनमध्ये करमाळीहून मुंबईकडे येताना नाश्त्यामधून झालेल्या विषबाधा प्रकरणात खाद्यपदार्थांचे नमूने प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल पंधरा दिवसांनी येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या ट्रेनचे आयआरसीटीसीचे मडगाव एरीया ऑफीसर आणि ऑन बोर्ड मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम आयआरसीटीसीने म्हटले आहे.



तेजस एक्स्प्रेसमध्ये करमाळीहून मुंबईकडे येताना २३० व्यक्ती प्रवास करत होते. या २३० पैकी २५ जणांना खाद्यपदार्थांचे सेवन केल्यावर त्रास जाणवू लागला. त्यामुळे चिपळूण स्थानकात दुपारी ३.३० ते ४ दरम्यान तेजस एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्यानंतर लगेचच रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करून अॅम्ब्युलन्सने विषबाधा झालेल्या प्रवाशांना ‘लाइफ केअर’ रुग्णालयात दाखल करण्यात आले.



जबाबदारी कोणाची?

प्रवाशांना खाद्यपदार्थांमधून झालेल्या विषबाधेला नेमण्यात आलेल्या कंत्राटदार कारणीभूत असल्याचा दावा अधिकारी करत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझमतर्फे (आयआरसीटीसी) विविध गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याची जबाबदारी घेतली जाते. त्यात काही प्रमुख गाड्यांमध्ये आयआरसीटीसीतर्फे स्वतः जबाबदारी घेतली जात असून काही गाड्यांमध्ये कंत्राटदार नेमले जातात. त्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या या गाडीसाठी आयआरसीटीसीने कंत्राटदार नेमला होता. पण, या कंत्राटदाराकडून पुरवल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांचा दर्जा तपासण्यात आला होता का?, संबंधित कंत्राटदाराचे बेस किचन, त्यातील खाद्य पदार्थांची तपासणी झाली होती का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.


सहप्रवाशांच्या उलट्यांमुळे मळमळ वाढली

ट्रेनमधील प्रवासी, एसी मॅकनिक, मोटरमन आणि टीटीई यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हिमाचल प्रदेश आणि कोलकाता येथील दोन टुरिस्ट ग्रुप ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यातील हिमाचलप्रदेशच्या ग्रुपमधील दोन मुलांना प्रथम उलट्या झाल्या. कोचमध्ये त्याचा वास पसरल्याने इतरांना उलट्या झाल्या. एसीमुळे उलटीचा दुर्गंध कोचमध्ये पसरल्याने काही पालकांनाही त्रास जाणवला.  या प्रकरणी कोलकाता येथील टुर मॅनेजर काजल चक्रवर्ती यांच्याशी आयआरसीटीसीने संपर्क केला.

संबंधित ग्रुप महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत गोव्याला गेला. त्यांच्यासोबत घरून आणलेले खाद्यपदार्थ होते. कोलकाताहून त्यांनी हिलसा नावाचा मासा आणला होता. या ग्रुपमधील सहा जणांसह एकूण २५ जणांना चिपळूणमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीही चक्रवर्ती यांनी दिली.


नेमकं काय आहे तेजस विषबाधा प्रकरण?

  • आयआरसीटीसीचा दावा, रेल्वेकडून दिल्या गेलेल्या जेवणामुळे विषबाधा नाही
  • आम्ही तातडीने सॅम्पल चेक केले त्यामध्ये काही आढळलं नाही
  • तेजसमध्ये कोलकाता इथून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून 24 लोकांचा ग्रुप प्रवास करत होता.
  • त्यांनी त्यांच्याकडे 15 दिवसांपासून काही खाद्यपदार्थ ठेवले होते. त्यामध्ये मासेही होते ते खाऊन ते गाडीत बसले होते.
  • या ग्रुपमधील लोकांना गाडीत बसल्यानंतर उलटीचा त्रास सुरू झाला आणि उलटीचा वास एसीमुळे संपूर्ण कोचमध्ये पसरला. त्यामुळे इतर प्रवाशांना उलटी होऊ लागली.



हेही वाचा - 

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा, कंत्राटदाराला नोटीस


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा