Advertisement

कर वसुलीसाठी पालिकेचा दणका, गाडी जप्त करताच कंपनीने भरले ५० लाख

मालमत्ता थकबाकीदारांविरोधात (property tax) मुंबई महापालिकेने (Mumbai municipal corporation) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तू जप्त करण्यास सुरूवात केली आहे.

कर वसुलीसाठी पालिकेचा दणका, गाडी जप्त करताच कंपनीने भरले ५० लाख
SHARES

मालमत्ता थकबाकीदारांविरोधात (property tax) मुंबई महापालिकेने (Mumbai municipal corporation) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तू जप्त करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेने मंगळवारी अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या ई सी एच डी सिल्क मिल्स या कंपनीची इनोव्हा कार (Innova car) जप्त (seized) केली. कार जप्त केल्यानंतर कंपनी खडबडून जागी झाली.  त्यानंतर या कंपनीने तात्काळ ५० लाख रुपयांचा धनादेश पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा करून जप्त केलेली कार सोडवून नेली.

ई सी एच डी सिल्क मिल्स कंपनीकडे १ कोटी ९६ लाख ८७ हजार २७६ रुपयांची मालमत्ता कराची  (property tax) थकबाकी होती. वेळोवेळी नोटीस बजावून व वारंवार सूचना देऊन देखील कंपनीने मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे या कंपनीची चल संपत्ती जप्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यानुसार कंपनीच्या मालकीची इनोव्हा कार (Innova car) मंगळवारी सकाळी जप्त (seized) करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने पालिकेच्या 'के पूर्व' विभाग कार्यालयात धाव घेत ५० लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश जमा केला. हा धनादेश प्राप्त झाल्यानंतर व उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर भरण्याची हमी देण्यात आल्यानंतर जप्त केलेली इनोवा कार सोडण्यात आली. 

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला आहे. रोज ८० कोटी रुपयांचा मालमत्ता कर (Property tax) वसूल करण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलं आहे. मालमत्ता कर  वसूल करण्यासाठी पालिकेने (Mumbai municipal corporation) वॉर्ड स्तरावर अभियान सुरू केलं आहे. 

महापालिकेने थकबाकीदारांची वॉर्डनिहाय टॉप टेन यादी तयार केली आहे. २४ पैकी १७ वॉर्डात टॉप टेन थकबाकीदार आहेत. त्यात बड्या बिल्डरांसह वैयक्तिक थकबाकीदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. या थकबाकीदारांनी तब्बल २६४४ कोटी रुपयांचा कर थकवला आहे. 



हेही वाचा -

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख

PNB घोटाळा : नीरव मोदीच्या संपत्तीचा आज लिलाव, लिलाव थांबवण्यासाठी मुलाची बॉम्बे कोर्टात धाव

मुंबई विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधून ६५,६२१ प्रवाशांची तपासणी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा