इमारतीची संरक्षण भिंत कोसळून गाड्यांचं नुकसान

जोगेश्वरीत संरक्षण भिंत कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या सहा गाड्या आणि एका दुचाकीचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकरची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कोसळलेल्या भिंतीखालील गाड्या बाहेर काढल्या.

SHARE

जोगेश्वरी परिसरात रविवारी एका इमारतीची संरक्षण भिंत कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या सहा गाड्या आणि एका दुचाकीचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकरची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कोसळलेल्या भिंतीखालील गाड्या बाहेर काढल्या.

गुरुवारपासून या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे इमारतीच्या भिंतीसह या भागातील अनेक झाडंही कोसळली होती.


येथे सर्वाधिक पावसाची नोंद

शुक्रवारी हवामन विभागाने सलग तीन दिवस म्हणजे १६, १७ आणि १८ जून रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मुंबईस ठाणे, वसई या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून वसई, पालघर, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा -

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

संबंधित विषय
ताज्या बातम्या