Advertisement

मुंबई विद्यापीठाचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

राज्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर अनेकांची घरं उध्वस्त झाली. काहींच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबई विद्यापीठाचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
SHARES

राज्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर (maharashtra flood) अनेकांची घरं उध्वस्त झाली. काहींच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं या पुरग्रस्तांतांना मदत करण्यासाठी अनेकजणांना मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न-धान्य, कपडे, पैसे अशा वेगवेगळ्या स्वरुपात लोक या पुरग्रस्तांना मदत करत आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठानं या पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) कक्षेतील महाड आणि चिपळूण इथं झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळं अनेकांवर संकटकालीन परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल उचलून गरजवंतांना अन्नाचे वाटप करण्यासाठी महाड येथील हिरवळ महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनला सुरुवात केली आहे.

'कम्युनिटी किचन' या संकल्पनेअंतर्गत दररोज ३०० गरजू लोकांच्या २ वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचं राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि विद्यार्थी विकास विभागानं याकामी पुढाकार घेतला आहे. महाड आणि चिपळूणसह अनेक ठिकाणी संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली. यासाठी विद्यापीठामार्फत नुकताच पाहणी दौरा करण्यात आला. त्यात महाडमधील महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली.

यामध्ये महाविद्यालयातील कार्यशाळा, कार्यालय, प्रयोगशाळा, दस्तऐवजांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे आढळून आले. विद्यापीठाच्या वतीने गरजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर टेमघर गावातील २०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ आणि डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या सहकार्यांने २८ तारखेपासून दुसरे कम्युनिटी किचन सुरू करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीतून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलं आहेत.

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी विद्यापीठाने शासनाच्या सहकार्यातून गेल्या वर्षी गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. समाजसेवेसाठी विद्यापीठाला ही एक संधी मिळाली असून, समाजसेवेचा वसा हा असाच अविरत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. तसेच गरजवंतांसाठी इच्छुकांनी सढळहस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



हेही वाचा -

KRK वर बलात्काराचा आरोप, मॉडेलनं केली पोलिसात तक्रार

करण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा