Advertisement

विलेपार्ले ते चारकोप परिसर २४ जूनला अंधारात!

मेट्रो-७ च्या कामांसाठी पहाटे ३ ते ५ या वेळेत विलेपार्ले ते चारकोपदरम्यानचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली.

विलेपार्ले ते चारकोप परिसर २४ जूनला अंधारात!
SHARES

मुंबई उपनगरातील विलेपार्ले (पश्चिम) ते चारकोपदरम्यानचा परिसर रविवारी २४ जूनला तब्बल २ तासांसाठी अंधारात जाणार आहे, ते देखील पहाटे-पहाटे. मेट्रो-७ च्या कामांसाठी पहाटे ३ ते ५ या वेळेत विलेपार्ले ते चारकोपदरम्यानचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली.


कुठल्या कामासाठी?

दहिसर ते डी. एन. नगर या मेट्रो-७ चं काम एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे. या कामांतर्गत पश्चिम द्रूतगती मार्गावरील ठाकूर काॅम्प्लेक्स, कांदिवली इथं यू गर्डर उभारणीचं काम २४ जूनला पहाटे करण्यात येणार आहे.


कुठं जाणार वीज?

या कामासाठी विर्लेपार्ले (प), जुहू, अंधेरी, वर्सोवा-जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि चारकोप येथील के पश्चिम आणि पी पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-मध्य आणि एच-पश्चिम या प्रभागांमधील वीज पुरवठा पहाटे ३ ते ५ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

याआधी मार्चमध्ये याच परिसरातील वीजपुरवठा उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्यासाठी एमएमआरडीएकडून बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी मुंबईकरांनी जसं सहकार्य केलं होतं तसंच सहकार्य यावेळीही करावं, असं आवाहनही कवठकर यांनी केलं आहे.



हेही वाचा-

झाडांच्या छाटणीची परस्पर परवानगी दिलीच कशी?- उच्च न्यायालय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा