कुर्लाच्या नेहरूनगर परिसरात ६० वर्षीय वृद्द महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील असे १९ तोळं सोनं चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. जरीना अन्वर शेख असे या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
हेही वाचाः- महाराष्ट्रात COVID चाचणीचे दर घटले, आता 'या' किंमतीत होणार चाचणी
कुर्लाच्या जागृतीनगर, वर्षा सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावर जरीना या त्यांच्या कुटुंबासह राहतात. रविवारी जरीना या रात्री एकट्यात असल्याचे पाहून अज्ञात चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. वृद्ध जरीना या मदतीसाठी आरडा ओरड करणार त्या आधीच चोरांनी जरीना यांची हत्या केली. त्यानंतर चोरांनी जरीना यांच्या अंगावरील आणि घरातील ५ लाख ७० हजार किंमतीचे १९ तोळं सोनं चोरून पशार झाले. शेजारी जरीना या घराबाहेर दिसत नाहीत म्हणून पहायला गेले असता. जरीना यांची हत्या झाल्याचे आणि घरातील साहित्य विसकटलेले निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली.
हेही वाचाः- भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी NIA ने तिघांना केली अटक
घटनेची माहिती मिळताच नेहरूनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराचा पंचनामा केला असून पोलिसांनी हत्या आणि चोरीचा म्हणजेच कलम ३०२,३९४, ४५७ भा.द.वि नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी इरफान निसार शेख नावाच्या घाटकोपर येथील चिराग नगर परिसरात राहणा-या तरुणाला अटक केली आहे. तो मृत महिलेचा पुतण्यात आहे