Advertisement

१०० टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई पहिले शहर

१०० टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई राज्यातील पहिले शहर ठरलं आहे.

१०० टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई पहिले शहर
SHARES

नवी मुंबई महापालिकेनं आपल्या क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. १०० टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. तर राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे.

१०० टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई राज्यातील पहिले शहर ठरलं आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ११ लाख ७ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५२ टक्के इतकी आहे.

ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला आणि पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांचेकरिता तसंच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्यानं नवी मुंबई महापालिकेला १०० टक्के लसीकरणाचा टप्पा पार करत आला असं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय.

राज्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील ७० टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच राज्यातील लसीकरण आणखी वेगात वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला आहे. त्यामुळे भविष्यात मिशन कवच कुंडल आणखी वेगाने राबवणार आहोत. देशाच्या लसीकरणात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे, असेही टोपे म्हणाले. दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रानं रविवारी ९.१४ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात रविवारी संध्याकाळपर्यंत १ लाख २९ हजार २२१ लोकांना लस टोचण्यात आली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आता पर्यंत ९,१४,३४,५८६ लोकोंचे लसीकरण झोले आहे.



हेही वाचा

मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन तयार, अपघात रोखण्यासाठी फायदेशीर

Colleges Reopens : ...तर महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा