Advertisement

४९ थकबाकीदारांना नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटीसा

थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत त्यांनी थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्यात येणार आहे.

४९ थकबाकीदारांना नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटीसा
SHARES

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करून त्यास मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र तरीही अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे या थकबाकीदारांविरोधात आता नवी मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत. 

दोन महिन्याहून अधिक सवलतीच्या कालावधीतही अभय योजनेस प्रतिसाद न देणाऱ्या व मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या ३१ मार्च २०२१ पूर्वीच्या २६ मालमत्ता कर थकबाकीदारांना १ ते १५ जून या कालावधीत मालमत्ता जप्तीची नोटीस बजाविण्यात आली होती. 

तर मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या आणखी ४९ थकबाकीदारांवर जप्तीची नोटीस पालिकेने बजावली आहे. यामध्ये बेलापूर विभागातील ७, नेरुळ विभागातील १०, वाशी विभागातील २, तुर्भे विभागातील २४ , कोपरखैरणे विभागातील ४ व घणसोली विभागातील २ मालमत्तांचा समावेश आहे. 

या मालमत्ताधारकांनी १०७ कोटीहून अधिक रकमेचा मालमत्ता कर थकवला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत ७५ मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत त्यांनी थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्यात येणार आहे.

थकबाकीदारांच्या थकीत रक्कमेची विभागनिहाय माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असून आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत याबाबतचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि थकबाकीदारांना रितसर नोटीसा बजाविण्यात येत आहेत.

मालमत्ता कर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्य असून याव्दारे जमा होणा-या महसूलातूनच नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येत असते. मालमत्ताकर थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाईची कटू वेळ येऊ न देता आपली मालमत्ताकराची थकबाकी तसंच नियमित मालमत्ताकर त्वरीत भरणा करावा असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.



हेही वाचा - 

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा