Advertisement

मुंबईत हॅलिपॅडची संख्या वाढणार!

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि. (MADC)ने हॅलिपॅड आणि हॅलिपोर्ट बांधण्यासाठी सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठेकेदारांना (EOI) निमंत्रीत केलं आहे.

मुंबईत हॅलिपॅडची संख्या वाढणार!
SHARES

या वर्षाच्या अखेरपर्यंत मुंबई महानगर परिसरात (MMR) हॅलिपॅडची संख्या वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि. (MADC)ने हॅलिपॅड आणि हॅलिपोर्ट बांधण्यासाठी सरकारी, निमसरकारी आणि खासगी ठेकेदारांना (EOI) निमंत्रीत केलं आहे.

सद्यस्थितीत ५ हॅलिपॅड

या माध्यमातून बोली लावणाऱ्या ठेकेदार कंपनीला ठिकठिकाणचे जमिनीचे कागदपत्रं जमा करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी हॅलिपॅड बांधणं शक्य आहे की नाही याचा अभ्यास करण्यात येईल. सद्यस्थितीत मुंबईत एकूण ५ हॅलिपॅड आहेत. त्यात जुहू एअरपोर्ट, महालक्ष्मी रेसकोर्स, राजभवन आणि आयएनएस कुंजली यांचा समावेश आहे.

महापालिकेकडे योजना

शहरात हॅलिपॅड बांधण्याची योजना महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC)  आणि मुंबई महापालिकेकडे (BMC) तयार आहे. या प्रकल्पासाठी ‘एमएडीसी’ नोडल एजन्सी म्हणून काम करेल. या प्रकल्पाला वर्षाखेरीस सुरूवात होण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा-

रेल्वे तिकीट आरक्षण करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार

पुणे-मुंबई रेल्वेमार्ग सुरू होण्यास आणखी २ दिवस?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा