Advertisement

मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७ हजाराने घटली

मागील एका महिन्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७ हजाराने घटली
SHARES

मुंबईत (mumbai कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने फैलाव झाला होता.  त्यानंतर मुंबई महापालिकेचे (mumbai municipal corporation) प्रयत्न आणि कडक निर्बंधांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली. रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून एका महिन्यात दीड लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रांची (restricted areas) संख्या तब्बल ७ हजार ३०१ ने घटली आहे. त्यामुळे १५ लाख १५ हजार रहिवाशांची कंटेन्टमेंट झोन (containment zone) मधून मुक्त झाले आहेत. 

मुंबईत २१ एप्रिल रोजी  कंटेन्टमेंट झोन, सील इमारती ( sealed building) आणि मजल्यांची संख्या १२ हजार ९७५ होती. यामध्ये महिनाभरात ७३०१ प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २१ मार्च ते २१ एप्रिल या एका महिन्यात २ लाख ३५ हजार २७ रुग्ण वाढले होते. मात्र, गेल्या एका महिन्यात १ लाख २ हजार ४७३ रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत सध्या ५३ कंटेनमेंट झोन आहेत. तर २१७ इमारती आणि ४७१७ इमारतींचे भाग-मजले सील आहेत. या ठिकाणी २ लाख ९३ हजार घरांमध्ये ११ लाख ७७ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.

मागील एका महिन्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.त्यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या मुंबईत २८ हजार ५०८ सक्रीय रुग्ण आहेत.  २१ एप्रिल रोजी सक्रीय रुग्णांची संख्या ८३ हजार ९३४ होती.

सध्या असलेल्या सक्रीय रुग्णांमधील १८ हजार ८०० रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर ८४२७ रुग्णांमध्ये लक्षणे असली तरी त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तर १२८१ रुग्ण अत्यवस्थ आहेत.

मुंबईत मंगळवारी १०३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ४२७ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५  झाली आहे. मंगळवारी मुंबईत ३७  रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील मृतांची एकूण संख्या १४ हजार ७०८ इतकी झाली आहे.



हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा