Advertisement

अखेर परिचारिकांचा संप मागे


अखेर परिचारिकांचा संप मागे
SHARES

अंधेरीतील राज्य कामगार विमा निगम रुग्णालयातील परिचारिकांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. गेल्या दिवसांपासून परिचारिका आणि रुग्णालय प्रशासनने हा संप ताणून ठेवला होता. या संपामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. गुरुवारी रात्री संप मागे घेतल्यानंतर परिचारिका त्वरीत कामावर रुजू झाल्या.

रुग्णालय प्रशासन बिनापरवानगी बदली करत असल्याच्या विषयावरुन परिचारिकांनी हा संप सुरू केला. गुरूवारी परिचारिकांसोबत झालेल्या बैठकीत प्रशासनाने परिचारिकांची बदली त्यांच्या संमतीनेच केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.


औरंगाबाद येथे नव्याने सुरू केलेल्या बाह्यरुग्ण विभागात कैलाशची बदली करण्यात येत होती. ती बदली सर्व नियमानुसार आणि परवानगी घेऊनच करण्यात येत होती. कैलाश धायल यांची बदली रद्द झालेली नाही. पण, त्यांच्या बदलीचा कालावधी कमी झाला आहे. त्यांना फक्त 2 महिनेच औरंगाबाद येथे काम करावे लागेल. त्यांना आम्ही कामावर नियमित कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन रुग्णांना त्रास होणार नाही.
- डॉ. राजीव गुरुमुखी, उपवैद्यकीय अधिकारी



गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. आभा जैन यांनी परिचारिकांची बदली त्यांच्या इच्छेनुसारच केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतरच हा संप मागे घेण्यात आला.
- सतीश बागल, सह-सचिव, राज्य कामगार विमा योजना नर्सेस असोसिएशन


गेल्या 10 दिवसांपासून 120 परिचारिका संपावर असल्याने जवळपास 300 खाटांवरील रुग्णांच्या सेवेत केवळ 10 परिचारिकाच होत्या. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. शस्त्रक्रिया, प्रसुतीसाठी येणारे रुग्ण दाखल करुन घेतले जात नव्हते. पण, संप मागे घेतल्यानंतर रुग्णालयात रुग्णांची पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.


जेवढे दिवस परिचारिका संपावर होत्या तेवढे दिवसही रुग्णालय प्रशासन भरुन देणार आहे. त्यांच्या पगारातून एक रुपया कमी करणार नाही. शिवाय संपात सहभागी परिचारिकांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही.
-डॉ. आभा जैन, वैद्यकीय अधिक्षक


हे देखील वाचा - 

नर्स संपावर, रुग्ण वाऱ्यावर...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा