मुंबईतील ६८९ 'एएलएम' निष्क्रीय, ५ दिवसांत सिद्ध करावी लागणार गुणवत्ता

मुंबईत तब्बल ७१९ 'एएलएम'च्या संस्था तयार करण्यात आल्या. मात्र त्यापैकी केवळ ३० संस्थाच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

SHARE

मुंबईतील ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प रावबण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या मदतीने प्रगत परिसर व्यवस्थापन(एएलएम) उपक्रम महापालिकेने हाती घेतला. यासाठी मुंबईत तब्बल ७१९ 'एएलएम'च्या संस्था तयार करण्यात आल्या. मात्र त्यापैकी केवळ ३० संस्थाच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल ९९ टक्के 'एएलएम' निष्क्रीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या सर्व 'एएलएल'ना पुढील ५ दिवसांत आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे.


'अशी' झाली सुरूवात...

ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटी स्तरावर व्हावे तसेच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून मुंबई महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे प्रमाण कमी करावे, यासाठी नोव्हेंबर १९९७ पासून शहरात ‘प्रगत परिसर व्यवस्थापन’ (एएलएम) या उपक्रमाची सुरुवात झाली.


फक्त ३० ठिकाणीच खतनिर्मिती

या उपक्रमांतर्गत एक किंवा अधिक इमारतींचे प्रतिनिधी एकत्र येऊन आपापल्या परिसरात ‘एएलएम’ ची स्थापना करत असत. सध्या मुंबईत प्रगत परिसर व्यवस्थापनांतर्गत महापालिका ७ हजारांपेक्षा अधिक इमारतींशी संलग्न आहे. तरीही या ‘एएलएम’द्वारे सध्या केवळ ३० ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. तर अनेक ‘एएलएम’ प्रत्यक्षात कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील यासर्व 'एएलएम' च्या कार्यक्षमतेची तपासणी करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.


'अशी' आहे विभागवारी

सध्या महापालिका क्षेत्रात 'एएलएम' द्वारे ‘ए’, ‘एच पूर्व’, ‘टी’ या विभागांमध्ये प्रत्येकी १ ठिकाणी, ‘जी/दक्षिण व आर/ मध्य’ या विभागात प्रत्येकी २ ठिकाणी, ‘के पूर्व’ विभागात ३ ठिकाणी, ‘एम /पूर्व’ विभागात ५ ठिकाणी, ‘एच/ पश्चिम’ विभागात ६ ठिकाणी तर ‘आर/ उत्तर’विभागात ९ ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते.


तर, नोंदणी रद्द

विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या परिसरातील ‘एएलएम’ अधिकाधिक कार्यक्षम होण्याच्यादृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करावयाचे आहेत. ज्या ‘एएलएम’द्वारे या बाबींना प्रतिसाद मिळणार नाही, अशा ‘एएलएम’ची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे आदेश नव्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत.

तसेच सर्व 'एएलएम' यांना त्यांचे अहवाल १६ ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याच्यादृष्टीने तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याचे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.हेही वाचा -

कचऱ्यापासून मिळावे स्वातंत्र्य, 'एम्स एएलएम'चा पुढाकार

चला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा परिसर करू स्वच्छ - एएलएमचा नाराडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या