Advertisement

रुग्णालायत लाडक्या `पेट`ची तुम्ही करू शकता सोबत!


रुग्णालायत लाडक्या `पेट`ची तुम्ही करू शकता सोबत!
SHARES
Advertisement

आपल्या घरातील एखादी आजारी व्यक्ती रुग्णालयात दाखल असेल तर, त्याच्यासोबत आपल्यालाही तेथे राहण्याची सोय असते. पण जर आपल्या घरातील पेट म्हणजेच पाळीव प्राणी आजारी असेल आणि त्याला उपचारासाठी प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले असेल तर आपल्याला त्याच्यासोबत राहता येत नाही. पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण यापुढे तुम्हीही तुमच्या आजारी पेटसोबत प्राण्यांच्या रुग्णालयात राहू शकता. परळच्या बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयात यापुढे तुम्ही आपल्या आजारी प्राण्यांसोबत राहू शकता. कारण, अशी सोयच या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.हे देखील वाचा -

परवान्याशिवाय पाळीव प्राणी,पक्षी विकण्यास बंदी

हे देखील वाचा - 

क्रॉफर्ड मार्केटमध्ये पशू-पक्ष्यांची विक्री करणाऱ्यांना मिळणार परवाना घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांना घरातल्या सर्वांचाच एवढा लळा असतो की, पालक आणि प्राणी एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. काही जणांना आपल्या प्राण्यांना रुग्णालयात एकट्याला सोडून जायचे नसते. असे प्राणी पालक कधी कधी आपल्या प्राण्यांसोबत रुग्णालयात राहण्याचा हट्टही करतात. प्राणीपालकांनी केलेल्या याच मागणीमुळे बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालय प्रशासनाने प्राणीपालकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. ही सुविधा लवकरच प्राणीपालकांना उपलब्ध होणार आहे.

कशी असेल सुविधा?

रुग्णालयाच्या आवारातच प्राणीपालकांच्या राहण्यासाठी 3 आणि प्राण्यांसाठी स्वतंत्र 4 कक्षाची बांधणी केली आहे. या रुग्णालयात पनवेल, वसई, नवी मुंबई, कल्याण या भागांतूनही पालक आपल्या आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी येथे येतात. प्राण्यांच्या उपचारासाठी अनेकदा 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे आपल्या प्राण्यांसोबत आलेल्या प्राणीपालकांची मोठी गैरसोय होते. हीच गैरसोय लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने मुंबईतील एका पारसी महिलेच्या देणगीतून हे कक्ष उभारले आहे. कक्षांमध्ये वातानुकूलित सेवाही देण्यात आली आहे. या खोलीत प्राण्यासोबत पालकही एकत्र राहू शकतात. त्याशिवाय प्राण्यांसाठी ऑक्सिजन पुरवणारे यंत्रही देण्यात आले आहेत. या रुममध्ये शौचालय, वातानुकूलित सेवा देण्यात आली आहे.पुढच्या काही दिवसांत प्राणीपालकांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्राणीपालकांसाठी 3 रुम्स आणि प्राण्यांसाठी स्वतंत्र 4 रुम्स देण्यात येणार आहेत. या खोलीत प्राणीपालक आपल्या प्राण्यासोबत खेळू शकतो, राहू शकतो. त्यासाठी एका दिवसाला जवळपास 3 हजार रुपये चार्ज केले जातील. या सर्व रुम्सची साफसफाई झाली असून लवकरच त्या प्राणीपालकांसाठी खुल्या करण्यात येतील. 

- डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, पशुवैद्यकीय रुग्णालय, परळ

संबंधित विषय
Advertisement