मुंबई आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे. तथापि, पुढील दोन दिवस शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी मुंबईचे तापमान 30.6 अंश सेल्सिअस, तर आर्द्रता 73% आहे.
IMD च्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, 25 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने सांगितले की, सोमवारी शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाने म्हटले आहे की, कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईतील AQI सध्या 54 रीडिंगसह 'चांगल्या' श्रेणीत आहे. 0 ते 50 मधील AQI 'चांगले', 51 ते 100 'समाधानकारक', 101 ते 200 'मध्यम', 201 ते 300 'खराब', 301 ते 400 'अतिशय खराब' आणि 401 'अत्यंत खराब' मानले जाते. 500 च्या पुढे गंभीर मानला जातो.
हेही वाचा