Advertisement

देशात प्रथमच पेट्रोल ९० रुपयांवर

देशाच्या इतिहास प्रथमच पेट्रोलच्या दराने ९० रुपयांचा अाकडा गाठला अाहे. परभणी शहरात सोमवारी पेट्रोलचा भाव ९० रुपयांच्या वर गेला. या ठिकाणी पेट्रोल प्रति लीटर ९०.०५ रुपयांला मिळत अाहेत.

देशात प्रथमच पेट्रोल ९० रुपयांवर
SHARES

मागील काही दिवसांमध्ये देशात पेट्रोल अाणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत अाहे. या दरवाढीविरोधात सोमवारी विरोधी पक्षांनी भारत बंद अांदोलनही केलं होतं. मात्र, या अांदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढले अाहेत. देशाच्या इतिहास प्रथमच पेट्रोलच्या दराने ९० रुपयांचा अाकडा गाठला अाहे. परभणी शहरात सोमवारी पेट्रोलचा भाव ९० रुपयांच्या वर गेला. या ठिकाणी पेट्रोल प्रति लीटर ९०.०५ रुपयांला मिळत अाहेत. याचबरोबर दिल्ली अाणि मुंबईत पेट्रोल अनुक्रमे ८०.८७ अाणि ८८.२६ रुपयांना मिळत अाहे.


१ जानेवारीला दर ७७.८७ रुपये

पेट्रोल अाणि डिझेलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य हैरान झाला अाहे. मात्र, सरकारने भाव कमी करण्यास स्पष्ट नकार दिला अाहे. या वर्षीच्या सुरूवातीला १ जानेवारी रोजी मुंबईत पेट्रोल ७७.८७ रुपयांना मिळत होते. हा दर वाढून ११ सप्टेंबरला ८८.२६ रुपयांवर गेला अाहे. तर  १ जानेवारीला मुंबईत डिझेलचा भाव ६३.५५ रुपये होता. अाता तो ७७.४७ रुपये झाला अाहे.

काँग्रेस सरकारचा दिलासा

पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात कच्या तेलाचे दर प्रति बॅरल १६० डाॅलर होता. यावेळी देशात पेट्रोलची किमत जास्तीत जास्त ८२ रुपये राहिली होती. मात्र अाता कच्या तेलाचे दर  प्रति बॅरल ७७ डाॅलरवर अाले अाहेत. पण भाव कमी होण्याएेवजी वाढतच अाहेत. पेट्रोलने ९० रुपयांचा अाकडा पार केला अाहे. 



हेही वाचा - 

'भारत बंद'नंतरही पेट्रोल दरवाढ काही थांबेना!

मुंबईत पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा