Advertisement

प्लास्टिक बंदी : एक दिवसात २५३ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

बुधवारी प्लास्टिक पिशव्यांवर केलेल्या कारवाईत दुकानं आणि आस्थापना विभागांच्या पथकांनी मुंबईतल्या विविध भागातील ९५० दुकानांची पाहणी केली. या दुकानांच्या पाहणीमध्ये दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर दंड देण्यास नकार देणाऱ्या ९ दुकानांबाबतचा तपासणी अहवाल तयार करण्यात आला. यासर्व दुकानदारांकडून सर्वाधिक अर्थात २४१ किलोच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.

प्लास्टिक बंदी : एक दिवसात २५३ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
SHARES

प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदीबाबत हाती घेण्यात आलेल्या कारवाईमध्ये बुधवारी एकूण ५ हजार ७३९ दुकाने, गाळे तसेच फेरीवाल्यांची पाहणी केली. यामध्ये एकूण २५३ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून सुमारे पावणे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


तपासणी अहवाल तयार

बुधवारी केलेल्या कारवाईत दुकानं आणि आस्थापना विभागांच्या पथकांनी मुंबईतल्या विविध भागातील ९५० दुकानांची पाहणी केली. या दुकानांच्या पाहणीमध्ये दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर दंड देण्यास नकार देणाऱ्या ९ दुकानांबाबतचा तपासणी अहवाल तयार करण्यात आला. यासर्व दुकानदारांकडून सर्वाधिक अर्थात २४१ किलोच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.

परवाना विभागाच्या पथकानं फेरीवाले, शॉपिंग सेंटर आणि मॉल्समधील गाळ्यांची पाहणी केली. यामध्ये एकूण ३८२ गाळ्यांची पाहणी केली. यामध्ये ७५ हजारांचा दंड वसूल करून ७ किलोच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.


५५ हजारांचा दंड वसूल

महापालिकेच्या सर्व मंड्यांमध्ये बाजार विभागाच्या पथकाने पाहणी केली. बाजारांमधील ४ हजार ४०७ गाळ्यांची पाहणी केली. यासर्वांकडून ५५ हजारांचा दंड वसूल करून ५ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट: कोळी भगिनींनो बिनधास्त वापरा थर्माकोल बॉक्स!

प्लास्टिक बंदी प्रदर्शनावरून नगरसेवकांमध्ये नाराजी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा