Advertisement

घाबरू नका, फक्त 'या' प्लास्टिकवरच होणार कारवाई!

प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास ५ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे घरात जरी प्लास्टिक आढळलं, तरी कारवाई होईल की काय? अशी भीती नागरीकांना सतावत आहे. परंतु असं काहीही नसून केवळ सार्वजनिक ठिकाणी, मॉल्स, दुकानांमध्येच ही प्लास्टिक बंदीची कारवाई केली जाणार आहे.

घाबरू नका, फक्त 'या' प्लास्टिकवरच होणार कारवाई!
SHARES

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला आज 23 जूनपासून सुरुवात झाली आहे. प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वापरावर कारवाई करण्यासाठी महापालिकेची पथकेही सज्ज झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास ५ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. मात्र घरात जरी प्लास्टिक आढळलं, तरी कारवाई होईल की काय? अशी भीती नागरीकांना सतावत आहे. परंतु असं काहीही नसून केवळ सार्वजनिक ठिकाणी, मॉल्स, दुकानांमध्येच ही प्लास्टिक बंदीची कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता घरातील सर्व प्लास्टिक पिशव्या कचरा संकलन पेटीत आणून टाकाव्यात आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.


'यावर' होणार कारवाई

  • सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या व थर्माकोल
  • थर्माकोलची ताट, कप पेले
  • प्लास्टिकचे कप, ग्लास, चमचे, वाटी
  • हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकींगकरता वापरण्यात येणारे प्लास्टिक भांडे-वाट्या
  • द्रवपदार्थ पिण्याचे प्लास्टिकचे स्ट्रॉ
  • द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारं प्लास्टिक
  • सजावटीसाठी वापरलं जाणारं प्लास्टिक वा थर्माकोल
  • डेअरीवरील सुट्या दुधासाठी वापरण्यात येणारी पिशवी


कोणत्या वस्तूंवर होणार कारवाई?

ड्रायफूटसह इतर किराणा मालाच्या दुकानात पॅकींग केलेल्या पारदर्शक प्लास्टिक पिशव्या


'यावर' होणार नाही कारवाई

  • उत्पादित कंपन्यांकडून येणाऱ्या वस्तू अथवा खादयपदार्थ
  • अमूल, गोकूळ सारख्या दुधाच्या पिशव्या
  • रेनकोट, पुस्तकांची प्लास्टिक कवर, पेनसाहित्य
  • उत्पादित कंपन्यांच्या पॅकींगमधील थर्माकोल, प्लास्टिकचे डबे


याच ठिकाणी होणार कारवाई

दुकानदार, मॉल्स, कॅटरर्स, घाऊक व किरकोळ विक्रेता, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, मंडई, स्टॉल, शासकीय व अशासकीय संस्था, शाळा-कॉलेज, उद्योग कंपन्या, क्रीडासंकुल-चित्रपट व नाट्यगृह, समारंभाचे हॉल


प्लास्टिक बंदीनंतर काय करावं?

  • कापडी जूट पिशव्यांचा वापर करावा
  • घरातून बाहेर निघताना कापडी पिशवी घेऊन निघा
  • पाण्याची स्टील किंवा ग्लासची बॉटल सोबत ठेवा
  • दूध, दही, मांस-मटण खरेदी करताना स्टील कंटेनर घरातून घेऊन निघा


दंडाची रक्कम किती?

प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तूंचा वापर करताना प्रथम आढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजारांचा दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


घरातलं प्लास्टिक 'इथं' द्या

मुंबई महापालिकेने प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये प्लास्टिक पिशव्यांसह वस्तू टाकण्यासाठी कचरापेट्या उपलब्ध करून दिलेल्या आहे. या पेट्यांमध्ये हे प्लास्टिक टाकले जावे. किंवा सोसायटींमध्ये एकत्र जमा केल्यानंतर महापालिकेच्या 1800222357 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून महापालिकेला कळवल्यास गाडी पाठवून हे प्लास्टिक गोळा करण्यात येईल.



या प्रदर्शनाला भेट द्या

प्लास्टिकला पर्याय ठरु शकतील, अशा वस्तूंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वरळी येथील 'नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया'च्या (एनएससीआय) प्रेक्षागारात शुक्रवारी २२ ते रविवार २४ जून २०१८ या कालावधीत होणार आहे. हे तीन दिवसीय प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधी दरम्यान सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.

यामध्ये ६१ 'स्टॉल्स' व महिला बचत गटांचे ५०'स्टॉल्स' देखील या प्रदर्शनात असणार आहे. त्यामुळे आपले घर, आपली सोसायटी, आपला व्यवसाय व आपल्या परिसरात प्लास्टिक बंदी अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या, असं आवाहन प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिमेचे समन्वयक व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी केलं आहे.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीला लालबागच्या राजाचा पाठिंबा

प्लास्टिक बंदी: कोळीणींना फेकून द्यावे लागणार मासे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा