Advertisement

प्लास्टिक बंदी: संचलनानंतर कारवाईला सुरूवात!

शनिवारी २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तूला आजच बाय म्हणा, नाहीतर तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. प्लास्टिक वस्तू आढळल्यास कारवाई करण्यासाठी महापालिकेचा परवाना विभाग, बाजार, दुकानं आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची २३ पथकं सज्ज झाली आहेत. आधी ही पथकं रॅलीद्वारे मुंबईभर फिरून आपली ओळख करून देणार आहेत. त्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे.

प्लास्टिक बंदी: संचलनानंतर कारवाईला सुरूवात!
SHARES

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्यात आज शनिवारी २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तूला आजच बाय म्हणा, नाहीतर तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल.



प्लास्टिक वस्तू आढळल्यास कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या परवाना विभागासह बाजार, दुकानं आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची २३ पथकं सज्ज झाली आहेत. आधी ही पथकं रॅलीद्वारे मुंबईभर फिरून आपली ओळख करून देतील. त्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे. याशिवाय प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यासाठी पालिकेने २५० अधिकारी नेमले आहेत.

प्लास्टिक बंदीबाबत समज गैरसमज पसरू लागले आहेत. यामुळे मुंबईकर संभ्रमात पडला आहे. परंतु ही प्लास्टिकबंदी नसून केवळ एकदाच वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोल आदी वस्तूंवरील कारवाई आहे. यामध्ये घरातील प्लास्टिक सामान यावर कारवाई नसल्याचं प्लास्टिक बंदी उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


'या' प्लास्टिकवर बंदी


'या' प्लास्टिकवर बंदी नाही



तर कारवाई होईल

प्लास्टिक पिशव्या, हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये दिलेलं पार्सल, लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमात वापरले जाणारे थर्माकोलचे ताट, प्लास्टिकचे चमचे, कप, ग्लास, दूध, दहीसह इतर वस्तू देण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिक पिशवी आदींवर प्रामुख्याने कारवाई केली जाणार आहे.



'अशी' होणार दंडात्मक कारवाई

पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास ५ हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदाही जर प्लास्टिक आढळून आल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास, अशी कारवाई केली जाणार आहे.


'वन टाइम यूज'वर कारवाई

सरसकट सर्वच प्लास्टिकवर सध्या कारवाई केली जाणार नसून जे वन टाइम यूज अर्थात एकदाच वापरुन फेकूल दिलं जातं अशाप्रकारच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पालिकेने नेमलेल्या पथकांमार्फत कुलाब्यापासून शहरातील काही भागांमध्ये रॅली काढली जाणार आहे. या माध्यमातून कारवाई करणाऱ्या पथकाची ओळख मुंबईकरांना करून देण्यात येणार आहे. कायद्याप्रमाणे ज्या वस्तूंवर कारवाई करायची आहे, त्याच वस्तूंवर कारवाई केली जावी. त्याबाहेर जावून ही कारवाई करून नागरिकांना नाहक त्रास दिला जावू नये याचसाठी हे पुन्हा एकदा प्रशिक्षण शनिवारी घेतल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलं. ग्राहकाला कुठेही त्रास न देता ज्यांच्याकडून याचा वापर आणि विक्री होते, त्यांनाच प्रथम टार्गेट केलं जाणार आहे.


प्रदर्शनाला २५ हजारांची गर्दी

प्लास्टिक पिशवी व थर्माकोल बंदीबाबतच्या या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी २० ते २५ हजार नागरिकांनी भेट दिली. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कार्यक्रमात तीन दिवसांमध्ये सुमारे १५ हजार नागरिकांनी भेट दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी आणि नागरिकांना सुट्टी नसताना एवढी गर्दी असेल तर शनिवारी आणि रविवारी ही गर्दी अधिक उसळण्याची शक्यता प्लास्टिक बंदी जनजागृती विभागाचं समन्वय व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केली आहे.


गटनेत्यांना डावललं

प्लास्टिक बंदीची जनजागृती म्हणून प्लास्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तू आणि पुनप्रर्क्रिया याबाबत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात महापालिकेचे विरोधी पक्षनेत्यांसह गटनेत्यांना डावलण्यात आलं आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह अजय देवगण-काजोल सेलिब्रेटीजना निमंत्रित करताना महापालिका प्रशासनाला विरोधी पक्षनेत्यांचाच विसर पडला. त्यामुळे हे नक्की प्रदर्शन कुणासाठी भरवलं होतं, असा सवाल गटनेत्यांकडून केला जात आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपल्याला देण्यात आली नाही, त्यांना समज देण्यात यावी, असं राजा यांनी म्हटलं.


हेही वाचा - 

बाजारात आल्या प्लास्टिकला पर्यायी वस्तू

प्लास्टिक बंदी लागूच, बंदीविरोधातील सुनावणी २० जुलैपर्यंत तहकूब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा