Advertisement

एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षा आणि शहरात उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं पोलिस उपायुक्त प्रवक्ते दीपक देवराज यांनी सांगितलं.

एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
SHARES

प्रकाश आंबेडकरांच्या एल्गार मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, असे करतानाच आझाद मैदान येथे आंदोलनाला परवानगी दिली आहे. दहावीच्या सुरू असलेल्या परीक्षा आणि शहरात उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं पोलिस उपायुक्त प्रवक्ते दीपक देवराज यांनी सांगितलं.


जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत परवानगी 

कोरेगाव भीमा जातीय हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या पाठोपाठ संभाजी भिडे गुरूजी यांच्या अटकेच्या मागणीसाठी प्रकाश आंबोडकर यांनी सोमवारी एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं. हा मोर्चा भायखळ्याच्या जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा काढण्यात येणार होता.


आझाद मैदानात आंदोलन 

मात्र, शहरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत, आझाद मैदान येथे आंदोलन करण्याला परवानगी दिली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त-प्रवक्ते दीपक देवराज यांनी परवानगी नाकारली आहे. तर या एल्गार मोर्चात सहभागी होणाऱ्यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.



हेही वाचा

भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका-प्रकाश आंबेडकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा