Advertisement

गिरगांव चौपाटीवर सौरउर्जेवर फिरते शौचालय, ९० टक्के पाण्याची बचत

मुंबई महापालिकेनं २४ तास सौरऊर्जेवर चालणारे फिरत्या वाहनवरील शौचालय प्रथमच उपलब्ध केले आहे.

गिरगांव चौपाटीवर सौरउर्जेवर फिरते शौचालय, ९० टक्के पाण्याची बचत
SHARES

मुंबईतील गिरगाव चौपाटी इथं भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई महापालिकेनं २४ तास सौरऊर्जेवर चालणारे फिरत्या वाहनवरील शौचालय प्रथमच उपलब्ध केले आहे. खासगी सहभागातून पर्यावरणस्नेही, ९०% पाणी बचत करणारे हे शौचालय आहे.

गिरगाव चौपाटीवर सध्या एकच शौचालय अस्तित्वात आहे. यामुळे एकमेव सार्वजनिक शौचालयावरील ताण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. मात्र या फिरत्या, अनोख्या शौचालयाची सुविधा पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. या शौचालयाला मिळणारा प्रतिसाद बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

या शौचालयात सौर उर्जेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये, महिलांसाठी १ आणि पुरुषांसाठी १ असे एकूण २ शौचकुपची व्यवस्था आहे. असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर स्थित आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरवता येते.

प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लीटर पाण्याचा उपयोग या शौचालयात होतो. त्यामुळे २०० लीटर पाण्याचा उपयोग करुन जवळपास १०० फ्लश करता येतात. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये २०० लीटर पाण्यात २० फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान १० लीटर पाणी वापरात येते. या हिशेबाने सदर निर्वात प्रसाधनगृहामध्ये तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होते.

प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर उर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. मेसर्स व्हॅकमॅन सॅनिटेशन सोल्यूशन प्रा. लि. यांच्यावतीनं महानगरपालिकेला सदर फिरते निर्वात प्रसाधनगृह पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास विनामूल्य तत्त्वावर पुरवण्यात येणार आहे.

स्वराज्य भूमी गिरगांव चौपाटीवर मंगळवारी या सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार, उप आयुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या व सिटीझन्स ऍक्शन नेटवर्क संस्थेच्या पदाधिकारी इंद्राणी मलकानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.



हेही वाचा

गुरुवारी आणि शुक्रवारी १० टक्के कपात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची तयारी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा