Advertisement

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; सर्वत्र गारेगार

मुंबईसह आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून, रिमझीम पाऊस पडत आहे.

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; सर्वत्र गारेगार
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसानं (mumbai rains) हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून, रिमझीम पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईत प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र, या पावसामुळं काहीसे थंड वातावरण निर्माण झालं असून, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री ७ वाजल्यापासून मुंबईत सुरू झालेल्या जलधारांचा वर्षाव रात्रीचे ९ वाजले तरी कोसळतच होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सोबतीला सुरू असतानाच नऊच्या सुमारास मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला. मात्र, सकाळ आणि दुपार अशा दोन्ही प्रहरी चकवा दिलेल्या मान्सून सरींनी रात्री दाखल होत मुंबईकरांना गारवा दिला.

पुढील ४ एक दिवस मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व सरींचा असाच वर्षाव होत राहील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा हाय अलर्ट

मुंबई मॉडेलचं अनुकरण अन्य शहरांत सुरू


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा