Advertisement

मुंबई मॉडेलचं अनुकरण अन्य शहरांत सुरू

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेनं दोन्ही कोरोनावर मात केली.

मुंबई मॉडेलचं अनुकरण अन्य शहरांत सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेनं (bmc) दोन्ही कोरोनावर मात केली. धारावी पॅटर्न आणि मुंबई मॉडेलचे जगात कौतुक झाले. मुंबई मॉडेलचं अनुकरण अन्य शहरांनीही सुरू केले आहे.

या सर्व उपाययोजनांची माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी राज्यातील महापालिकांच्या आयुक्तांशी नुकताच ऑनलाइन संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. महापालिकेनं कोरोना नियंत्रणासाठी राबविलेले विविध उपाय, नियोजन, अंमलबजावणीची सविस्तर माहिती आयुक्त चहल यांनी दिली. यावेळी राज्यातील (maharashtra) विविध महापालिकांचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे उपाय ठरले प्रभावी

  • कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून 'पॉझिटिव्ह' अहवाल महापालिकेकडे निर्धारित वेळेत उपलब्ध करून घेतले.
  • गरजेनुसार रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व २४ प्रशासकीय विभागांत 'वॉर रूम' कार्यान्वित करण्यात आल्या.
  • ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजनचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, बाधित रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध आदींवर भर देण्यात आला.
  • प्रत्येक वॉर्ड वॉर रूममध्ये डॉक्टर, कर्मचारी, सहाय्यक दिवसाचे २४ तास कार्यरत असतात.
  • रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी शीघ्रकृती कार्यक्रम राबवला.

मागील दोन महिने महाराष्ट्रातील (maharashtra)  कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती.  नव्या रुग्णांचा आकडा  ५० ते ६० हजारांवर गेला होता. मात्र, आता रुग्णसंख्या घटू लागली आहे.  मंगळवारी राज्यात १४ हजार १२३ नवीन रुग्ण आढळले. तर ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत (mumbai) मंगळवारी ८३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ५८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत   १७३२८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५३ दिवसांवर गेला आहे.

राज्यात कोरोनाची कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ झाली आहे. यामधील ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery Rate) ९४.२८ टक्के ढे झाले आहे. मृत रुग्णांची संख्या ९६ हजार १९८ इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के आहे. 



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा