Advertisement

१२ उपनगरीय रुग्णालयात आयसीयू सेवा

मुंबई महापलिकेच्या १२ उपनगरीय रुणालयांमध्ये एमआयसीयू विभागात २०० बेड्स उपलब्ध आहेत. त्यासाठी या सर्व एमआयसीयू विभागात २४ तास डॉक्टर उपलब्ध असणं आवश्यक आहे. परंतु महापालिकेकडे तेवढ्या प्रमाणात डॉक्टर नसल्यामुळे आता या विभागासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

१२ उपनगरीय रुग्णालयात आयसीयू सेवा
SHARES

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआयसीयूचे विभाग सुरु करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या विभागांमध्ये डॉक्टरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे डॉक्टरांअभावी रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन आता खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १२ उपनगरीय रुग्णालयांमधील आयसीयू विभागांच्या देखभालीचं कंत्राट खासगी संस्थांना दिलं जात असून या संस्थांच्या माध्यमातून या विभागात खासगी तज्ज्ञ डॉक्टरांसह आयसीयू सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


एमआयसीयूत २०० बेड्स

मुंबई महापलिकेच्या १२ उपनगरीय रुणालयांमध्ये एमआयसीयू विभागात २०० बेड्स उपलब्ध आहेत. त्यासाठी या सर्व एमआयसीयू विभागात २४ तास डॉक्टर उपलब्ध असणं आवश्यक आहे. परंतु महापालिकेकडे तेवढ्या प्रमाणात डॉक्टर नसल्यामुळे आता या विभागासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


कुणाला मिळालं कंत्राट?

या १२ रुग्णालयांमध्ये स्पर्धात्मक निविदा व्हावी यासाठी प्रत्येक ३ रुग्णालये याप्रमाणे ४ गट तयार करून त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात या १२ रुग्णालयांपैकी ९ रुग्णालयांमधील एमआयसीयू विभागात डॉक्टरांची तत्सम सेवा देण्याच्या कामांसाठी जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्ट ही पात्र ठरली आहे.

क्रिटीकल केअर असोशिएट्सला दोन रुग्णालये आणि साई समृद्धी हॉस्पीटलला एका रुग्णालयाचे काम मिळालं आहे. या सर्व रुग्णालयांमधील आयसीयू सेवांसाठी सुमारे ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक दिवशी प्रति बेडसाठी १७०० ते २२०० रुपये एवढे खर्च केले जाणार आहे.


कोणत्या संस्थांकडे कंत्राट ?


संस्था: जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्ट

  • भाभा, वांद्रे (१२)
  • हिंदूहृयसम्राट बाळसाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालय, जोगेश्वरी (२०)
  • व्ही. एन. देसाई रुग्णालय, सांताक्रूझ (२०)
  • कंत्राट: ६.८६ कोटी रुपये


संस्था: जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्ट

  • सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव (१२)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (३०)
  • भगवती रुग्णालय, बोरीवली (१०)
  • कंत्राट: ८.५७ कोटी रुपये


संस्था: क्रिटीकल केअर असोसिएट्स

  • राजावाडी, घाटकोपर (२१)
  • संत मुक्ताबाई, घाटकोपर (१०)
  • कंत्राट : ४.९७ कोटी रुपये


संस्था: साई समृद्धी हॉस्पीटल

  • कुर्ला भाभा (१०)
  • कंत्राट: १.६० कोटी रुपये


संस्था: जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट

  • मालवीय रुग्णालय, गोवंडी (२०)
  • महात्मा फुले, विक्रोळी (१०)
  • एम. टी. अग्रवाल, मुलुंड (२५)
  • कंत्राट : ८.८३ कोटी रुपये



हेही वाचा-

टी.बी. रुग्णांना दरमहा ६३१ रुपयांचा पौष्टिक आहार

महापालिका रुग्णालयेही आता इस्कॉनच्या ताब्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा