Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

येत्या काही वर्षात वाहतूकव्यवस्था होणार सक्षम

मुंबईतील वाहतूक व्यवस्था येत्या काही वर्षात सक्षम होणार आहे. त्यासाठी काही रकमेची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

येत्या काही वर्षात वाहतूकव्यवस्था होणार सक्षम
SHARE

मुंबईतील वाहतूक व्यवस्था येत्या काही वर्षात सक्षम होणार आहे. त्यासाठी काही रकमेची गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील एकूणच वाहतूकव्यवस्था तसंच, महामार्ग अधिक सक्षम करण्यासाठी २०२१ ते २०४१ या कालावधीत टप्प्याटप्प्यानं तब्बल ४ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक मेट्रो प्रकल्पांसाठी केली जाणार आहे.

मेट्रो मार्गांसाठी २०२१ या वर्षात २६ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात बसलाही प्राधान्य देण्यात आलं आहे. मेट्रो प्रकल्पांसह, बस, त्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे, महामार्ग व टर्मिनल आदी पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.

२०२१, २०२२ ते २६, २०२७ ते ३१ व २०३२ ते थेट २०४१ असे टप्पे आखण्यात आले आहेत. 'लघू', 'मध्यम' व 'दीर्घ'कालीन नियोजन असं नियोजनाचं ३ प्रकार करण्यात आले आहेत. मेट्रो मार्गापाठोपाठ महामार्ग बळकटीवर भर देण्यात आला असून, यासाठी एक लाख २३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बसचे २ विभाग करण्यात आले असून, पहिल्या विभागासाठी एकूण ५२५० कोटी, तर दुसऱ्या विभागात ६५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बेस्ट उपक्रम तसंच नवी मुंबई व ठाणे परिवहन सेवेतील बसचाही त्यात समावेश आहे. बसवाहतूक जलद गतीनं व्हावी, अधिक संख्येनं प्रवाशांनी या सेवेचा वापर करावा यासाठी स्वतंत्र मार्गिका आखण्याचा विचार अनेक वर्षांपासून होत आहे.

वाहतूकव्यवस्थापन व उपाय यावर भर देण्यात आला आहे. व त्यासाठी ४२ हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते व महामार्ग सक्षम झाले, त्यांचा विस्तार झाला, तर वाहतूक अन्यत्र वळवता येणार आहे. त्यामुळं एकाच रस्त्यावर मोठा भार पडणार नाही.

प्रकल्प २०२१ २०२२-२६ २०२७-३१ २०३२-४१ एकूण
मेट्रो २६,७८७ १,१४,१२१ ५१,१०९ १३,६७३ २,०५,६९०
रेल्वे ७,२९० ४९,७९११३,७२९ ३०,२७५ १,०१,०८५
बस स्वतंत्र मार्गिका २६४  ३,०३६१,५०२  ४४८५,२५०
बस प्रणाली ८१५ १,४२१ १,८२३ २,४४० ६,५००
महामार्ग यंत्रणा २०,५५० ४६,९१३ ४६,१८१ १०,१३१ १,२३,७७४
टर्मिनल१,७९० २,२९५ २,०७२ २,४९३ ८,६५०
वाहतूक 
११,०८५ ७,१२४ ७,९८५ १६,१६९ ४२,३६३


व्यवस्थापन उपाय

  • सन २०४१पर्यंत मेट्रो मार्गांची लांबी ४६७ किलोमीटर
  • रेल्वे २३२ किलोमीटर
  • बस ४३१ किलोमीटर
  • महामार्ग १,१४१ किलोमीटरहेही वाचा -

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर

बोईसर येथील औद्योगिक क्षेत्रात स्फोट, ८ जण ठारसंबंधित विषय
ताज्या बातम्या