Advertisement

पालघरमधल्या पर्यटन स्थळांवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...

२ जुलै रोजी जोहरच्या काळ मंडावी धबधब्यात पाच तरुण बुडाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

पालघरमधल्या पर्यटन स्थळांवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...
SHARES

मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी लोकांना बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता स्थानिक देखील पालघरमधील पर्यटनस्थळांना भेट देऊ शकत नाहीत. धबधबे, तलाव, धरणे, किल्ले आणि किनारे बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत. २ जुलै रोजी जोहरच्या काळ मंडावी धबधब्यात पाच तरुण बुडाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यास ९ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक ट्रेक आयोजित केले जातात. पण पावसाळ्यातील ट्रेकदेखील होऊ देणार नाहीत. पालघरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या १ हजार ५७७ वर गेली आहे. पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी काही ठिकाणी प्रभावी सिद्ध होत आहे. जिल्हाधिकारी म्हणाले आहेत की, प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारासाठी खूप उपयुक्त आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशात लोकांना बाहेर पडण्यावर बंदी आहे. सर्व पर्यटन स्थळंदेखील बंद आहेत. पण तरीहीदेखील काही लोक नियमांचं उल्लंघन करत आहेत.

२ जुलैला अंबिका चौक भागात राहणारी १३ जण कालमांडवी धबधब्यात अंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ५ जण बुडाले होते. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले.

प्रथमेश चव्हाण (वय २०), देवेंद्र वाघ (वय २८), निमेश पटेल (वय २८), देवेंद्र फलटणकर (१९) आणि रिंकू भोईर (२०) अशी या ५ जणांची नावं आहेत. याच घटनेनंतर पालघरमधील पर्यटन स्थळांवरील निर्बंध काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



हेही वाचा

पालघरमधल्या धबधब्यात वाहून गेलेल्या ५ जणांचे मृतदेह सापडले


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा