Advertisement

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळं बेस्टचं २६ कोटींचं नुकसान


पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळं बेस्टचं २६ कोटींचं नुकसान
SHARES

इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांबरोबरच मालवाहतूकदार, खासगी वाहतुकदार तसंच एसटीलाही बसत अाहे. बेस्टच्या काही गाड्या डिझेलवर चालतात. त्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून जी डिझेल दरवाढ होत आहे, त्याचा मोठा फटका बेस्ट प्रशासनाला बसत असून बेस्टवर २६ कोटींचा अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती बेस्ट समितीचे सदस्य अनिल कोकीळ यांनी दिली. हा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी डिझेलवरील अधिभार माफ करण्याची मागणी बेस्ट राज्य सरकारकडे करणार असल्याचंही कोकीळ यांनी सांगितलं.


दुष्काळात तेरावा महिना

बेस्टच्या अधिकाधिक गाड्या सीएनजीवर चालतात. पण आजही बेस्टकडे डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. या गाड्यांसाठीच्या डिझेल खरेदीवर बेस्टला अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. डिझेलचे दर वाढल्यानं तब्बल २६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार बेस्टवर पडला आहे. मुळात बेस्ट गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात असून या अतिरिक्त खर्चामुळं बेस्टसाठी 'दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


अतिरिक्त खर्चावर चर्चा

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या अतिरिक्त खर्चावर चर्चा करण्यात अाली. या चर्चेतून डिझेल खरेदीवरील अधिभार माफ करावा, अशी मागणी एकमताने झाली. त्यानुसार लवकरच ही मागणी राज्य सरकारसमोर ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं बेस्टची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत, हा अधिभार माफ करावा, असंही बेस्ट सदस्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

बेस्टच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्यास महापालिकेची नकारघंटा

शिवसेनेला बेस्ट वाचवायचीय की बुडवायची?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा