ज्येष्ठ क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर २५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मुंबई हाफ मॅरेथाॅनला झेंडा दाखवून स्पर्धेची सुरूवात करेल.
या हाफ मॅरेथाॅनमध्ये १७,५०० स्पर्धक सहभागी होत आहेत. ही हाफ मॅरेथाॅन २१ किमी अंतराची असून स्पर्धेला पहाटे ०५.१५ मिनिटांनी सुरूवात होईल. तर १० किमीची स्पर्धा सकाळी ०६.१५ वाजता आणि ५ किमीची स्पर्धा सकाळी ०८.१५ वाजता सुरू होईल.
या स्पर्धेविषयी सचिन म्हणाला की, भारत खेळाची आवड असणाऱ्या देशापासून खेळण्याची आवड असणाऱ्या देशाकडे बदलत आहे. यांसारख्या स्पर्धांमधून तरूणांना विविध खेळांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा मिळेल.
हेही वाचा-
रोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द
विराट कोहलीनं एका शतकात मोडले २ विक्रम