Advertisement

मॅनहोल्सच्या आत जाळीची सुरक्षा?


मॅनहोल्सच्या आत जाळीची सुरक्षा?
SHARES

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा रस्त्यावरील मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर मॅनहोल्सचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता त्यावर जाळी बसवण्याची संकल्पना पुढे येत आहे. समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी ही संकल्पना मांडून मॅनहोल्सवर जाळी बसवण्याची सूचना केली आहे.

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे एल्फिन्स्टन येथील मटकर मार्गावरील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने डॉ. अमरापूकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. महापालिकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने याप्रकरणी महापालिकेला दोषी धरण्यात यावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या दुर्घटनेनंतर सामान्य जनता जागरुक झाली असून एका नागरिकाने आपली भेट घेऊन मॅनहोलवरील जाळीची संकल्पना मांडली. ही लोखंडी जाळीची संकल्पना केतन कदम नावाच्या नागरिकाची असल्याचे रईस शेख यांनी सांगितले.

या जाळीचे दोन फायदे असून यात कचरा अडकून राहू शकतो. शिवाय त्यात कोणी पडला तरी तो आतमध्ये न जाता वरच सुरक्षित अडकून राहू शकतो, असे रईस शेख यांनी सांगितले. मुंबईत ज्या भागात पाणी तुंबते, त्या-त्या ठिकाणी प्राधान्याने या जाळ्या बसवल्या जाव्यात ही आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत मल:निस्सारण वाहिन्यांवर एकूण ६७ हजार ७०७ मॅनहोल असून हे सर्व मॅनहोल रस्त्यांच्या मधोमध आहेत.



हेही वाचा - 

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा