Advertisement

गोरेगावच्या फिल्मसिटीत बिबट्या, सांबराची शिकार


गोरेगावच्या फिल्मसिटीत बिबट्या, सांबराची शिकार
SHARES

गोरेगावच्या दादासाहेब फाळके फिल्मसिटीत मादी बिबट्या आणि नर सांबराचं कुजलेल्या अवस्थेतील मृत शरीर वन विभागाला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या पंजातील ११ नखे आणि सांबराचं शिर गायब असल्यानं तस्करीसाठी या दोघांची शिकार झाल्याचं समोर येत आहे.


कुठे सापडले अवशेष?

कर्ण संगिनी या हिंदी मालिकेच्या शुटिंगसाठी उभरण्यात आलेल्या सेटच्या १०० मीटर अंतरावर सोमवारी मृत अवस्थेतील मादी बिबट्याचं शरीर आढळून आलं. या मादी बिबट्याचं वय जेमतेम ४ वर्षे आहे. बिबट्याच्या पोटाकडील भागावर व्रण असल्याने सापळ्यात अडकून तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे. या मादीची ११ नखे गायब असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.


बिबट्याच्या शरीरापासून ५० मीटरच्या अंतरावर वन अधिकाऱ्यांना सांबराचं शरीर आढळून आलं. या सांबराचा डावा पाय सापळ्यात अडकून त्याचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे.


सापळा सापडला

वन अधिकाऱ्यांना काही अंतरावर झाडाला लावलेला रिकामा सापळाही आढळून आल्यानं या परिसरात तस्करांचा वावर असल्याचं समोर आलं आहे. एकाच दिवशी २ वन्य जिवाचे मृतदेह आढळून आल्याने आरे वसाहत आणि फिल्मसिटी परिसरात वावरणाऱ्या वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सुमारे २० ते २५ दिवसांपूर्वी झालेला असावा. कारण त्यांचं शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळून आलं आहे. बिबट्याचं शरीर पूर्णपणे विघटित झाल्यानं त्याच्यावर शवविच्छेदन करता येणार नाही. तरी वन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
- डॉ.शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान



हेही वाचा-

मुलुंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

विरारच्या मांडवीमधील शेतात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा