Advertisement

सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल मांडणार फेरीवाल्यांची बाजू!


सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल मांडणार फेरीवाल्यांची बाजू!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गाजत असलेल्या फेरीवालाप्रकरणी आता आणखी राजकारण रंगणार आहे. त्याचं कारण आहे मुंबईतील फेरीवाल्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पुढे सरसावणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दुपारी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. का मांडणार कपिल सिब्बल बाजू?

फेरीवाल्यांसंदर्भातील १ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाला संजय निरुपम सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत आणि त्यासाठी कपिल सिब्बल हा खटला लढवतील, असं म्हटलं जात आहे.  


मुंबई हायकोर्टाचा निर्णय काय?

फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणारे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उच्च न्यायालयाने दणका दिला होता. 

  1. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करु देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
  2. निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्याची सक्ती
  3. शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या १०० मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई
  4. रेल्वे स्टेशन, महापालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई
  5. रेल्वे पादचारी पूल, स्कायवॉकवर फेरीवाल्यांना मनाई


हेही वाचा

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement