Advertisement

परळ ते दादर दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी

परळ इथं फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहिल्याने दादर टी.टी.पासून परळपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

परळ ते दादर दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी
SHARES

परळ- टी.टी. उड्डाणपूल परिसरातील स्लीप रोड इथं गुरुवारी सकाळी ४८ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामासाठी उड्डाणुलाची एक मार्गिका पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. जलवाहिनी दुरूस्तीचं काम शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहिल्याने दादर टी.टी.पासून परळपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.


लवकरच वाहतूक पूर्वपदावर

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात कोणत्याही प्रकारचा अढथळा येऊ नये, यासाठी परळ टी.टी. उड्डाणपुलाखालील डॉ. बाबासाहेब मार्गावरील वाहतूक नायगाव क्रॉस रोड मार्गे वळवण्यात आली आहे. महापालिकेचं जलवाहिनी दुरूस्तीचं काम जवळपास पूर्ण झाल्याने लवकरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
- संजय सावंत, एपीआयप्रवाशांचे हाल

जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी २४ तासांहून अधिक काळ लागल्याने या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोेठ्या प्रमाणात हाल झाले. किंग सर्कलहून येणाऱ्या प्रवाशांना लालबाग इथं जाण्यासाठी माटुंगा बी.ए. रोड मार्गे जावं लागत असल्यानं त्यांच्या त्रासात भरच पडली.


दुरूस्तीचं काम पूर्ण

जलवाहिनी दुरूस्तीचं काम आम्ही गुरुवारी सकाळी ८ वाजता हाती घेतलं होतं. शुक्रवारी दुरूस्तीचं काम पूर्ण झालं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर या जलवाहिनी दुरुस्तीचं काम पूर्ण केलं.
- जीवन पाटील, सहाय्यक अभियंता, जलकामे तातडीचा दुरूस्ती विभागहेही वाचा-

आश्रय योजनेच्या पुनर्विकासाला नौदलाची आडकाठी

साचलेल्या पाण्यातून बुलेट ट्रेन चालवणार का ? उच्च न्यायालयाचा टोलासंबंधित विषय