Advertisement

गोराईत पक्षी अभयारण्य उभारण्याची शिवसेनेची मागणी

सन १९९५ ते १९९९ च्या युती सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोराई परिसरात पक्षी अभयारण्य साकारण्याची संकल्पना मांडली होती. त्याच अनुषंगानं मुंबईत ठिकठिकाणी काँक्रिटची जंगलं उभी राहत असतानाच परराज्यातून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांसाठी एखादी जागा आरक्षित असणं आवश्यक असल्याचं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

गोराईत पक्षी अभयारण्य उभारण्याची शिवसेनेची मागणी
SHARES

पवई तलावाच्या परिसरात पक्षी उद्यान विकसित करण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेला ७ वर्षे उलटत आली तरी हे पक्षी उद्यान उभारता आलेलं नाही. हे पक्षी उद्यान अद्याप कागदावर असताना आता शिवसेनेकडून गोराई परिसरात पक्षी अभयारण्य उभारण्याची मागणी होत आहे.

कुणाचं निवेदन?

शिवसेनेच्या दहिसरमधील नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन सादर करून गोराई परिसरात पक्षी अभयारण्य उभारण्यासाठी सन २०३४ च्या विकास नियोजन आरखड्यात जागा आरक्षित करण्याचा मागणी केली आहे.
मुंबईत गेल्या शनिवारपासून गोराई खाडी परिसरात फ्लेमिंगोंचं दर्शन होऊ लागलं आहे.

पक्षप्रमुखांची संकल्पना

सन १९९५ ते १९९९ च्या युती सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोराई परिसरात पक्षी अभयारण्य साकारण्याची संकल्पना मांडली होती. त्याच अनुषंगानं मुंबईत ठिकठिकाणी काँक्रिटची जंगलं उभी राहत असतानाच परराज्यातून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांसाठी एखादी जागा आरक्षित असणं आवश्यक असल्याचं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

प्लास्टिकबंदीचे परिणाम

शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईकरांनी या प्लास्टिक बंदीचं स्वागत केलं असून त्याचेच हे चांगले परिणाम आता पाहायला मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या पाहुण्या पक्ष्यांसाठी गोराईतील जागा आरक्षित केल्यास पक्ष्यांना याठिकाणी आल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही. शिवाय पर्यटकांनाही अभ्यास व निरक्षण करता येईल, असं त्यांनी सांगितलं.

पक्षी उद्यानाची प्रतीक्षा

पवईत पक्षी उद्यान बनवून त्यामध्ये राणीबागेतील पक्षी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पक्षी उद्यानासाठी सल्लागाराची निवड होऊन पुढील कार्यवाहीही करण्यात आली होती. परंतु आजतागायत पवईत पक्षी उद्यान बनवण्यात आलं नसून मुंबईकर पक्षी उद्यानाच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा-

मालाडमध्ये फ्लेमिंगोची शिकार! सहा जण ताब्यात

एेरोलीमध्ये फ्लेमिंगो पाहाण्यासाठी बोट राईड!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा